Mukhyamantri Vayoshree Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध नागरिकांना मिळणार 3000 रुपये, पहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया

Mukhyamantri Vayoshree Yojana: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेची सुरुवात ही राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धपकाळातील आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी केलेली आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेमधून वृद्ध नागरिक आर्थिक सहाय्यासाठी त्यांच्या उपयोगी च्या वस्तू खरेदी करू शकतात. वयोश्री योजनेअंतर्गत राज्यातील वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्ध अवस्थेत आवश्यक असणारी उपकरणे ते या पैशाच्या माध्यमातून खरेदी करू शकतात. जेणेकरून ते वृद्ध पकाळातील आवश्यक उपकरणे खरेदी करू शकतात. व त्यांचा त्या उपकरणांचा फायदा होईल.

 

तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या या योजनेअंतर्गत 60वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने या योजनेसाठी मान्यता देखील दिलेली आहे. या योजनेचा फायदा दहा लाख पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात. इच्छुक उमेदवारांना यासाठी आपला अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. जर तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर आजचा लेख शेवटपर्यंत वाचा. जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल की कोण कोणते नागरिक यासाठी पात्र असणार आहेत. व यासाठी कोणकोणत्या अटी या योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या आहेत.

योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना
योजनेची सुरुवात 16 फेब्रुवारी 2024
कोणी सुरू केली योजना महाराष्ट्र सरकार
लाभार्थी 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे महाराष्ट्राचे सर्व रहवासी
योजनेचा लाभ वृद्ध नागरिकांना 3000 हजार रुपये दिले जाणार आहेत.
योजनेचा उद्देश राज्यातील वरिष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे.
मिळणारी एकूण रक्कम 3000/- रुपये
अर्ज पद्धत ऑफलाईन

 

मित्रांनो आता काही दिवसांवरती विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. यामुळे आता महाराष्ट्र सरकार हे नवनवीन योजनांची घोषणा करत आहे. आता नुकतीच काही दिवसां आधी प्रधानमंत्री वयोश्री योजनेची घोषणा केलेली होती. त्यानंतर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर दुसरी योजना म्हणजे महत्त्वाची योजना ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या अशा बऱ्याचशा योजनांचा फायदा आता नागरिकांना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

या विविध योजनांचा लाभ आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करून घेऊ शकतो. परंतु मित्रांनो बऱ्याचशा नागरिकांना आणखी देखील मोबाईलच्या मदतीने अर्ज करता येत नाहीत. परंतु आपण तुम्हाला अर्ज करण्याची सोपी आणि साधी सिंपल पद्धत सांगणार आहोत. त्याच्या मदतीने आपण आपल्या मोबाईलचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकतो. यासाठी मित्रांनो आपला ब्लॉग आजचा तुम्ही शेवटपर्यंत वाचा. जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल, व यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा याबाबतची माहिती समजून जाईल. तर मित्रांनो जरासा ही वेळ वाया न घालवता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे.?

महाराष्ट्र सरकारने 60 वर्ष किंवा 65 वर्षांपुढील नागरिकांना वृद्धपकाळात आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत वृद्ध नागरिकांना पेन्शन मिळत राहणार आहे. जेणेकरून ते आपला खर्च त्या पेन्शन द्वारे भागवू शकतात. वृद्धपकाळात आवश्यक असणारी उपकरणे खरेदी करण्यासाठी हे पैसे डीबीटी अंतर्गत वृद्ध नागरिकांच्या अकाउंट मध्ये जमा केले जातात.

मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षापेक्षा पुढील सर्व नागरिकांना 3000 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत 70 टक्के पुरुषांना व 30 टक्के महिलांना याचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम नागरिकांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारा जमा करण्यात येत असते. 65 वर्षांपुढील सर्व नागरिकांना या योजनेअंतर्गत 3000 हजार रुपये दिले जातात. या योजनेसाठी आपल्याला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे, व पात्रता काय याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता (Mukhyamantri Vayoshree Yojana Eligibility)

  • 65 वर्षांपुढील सर्व पुरुष व महिला यासाठी अर्ज करू शकतात. 
  • फक्त महाराष्ट्रातील रहिवासी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. 
  • परंतु अर्जदाराचे वय हे 31 डिसेंबर 2023 पर्यंत 65 वर्षापेक्षा जास्त झालेले असणे आवश्यक आहे. 
  • आपल्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावे. 
  • याव्यतिरिक्त शारीरिक दृष्ट्या काही आजार असल्यास किंवा अपंगत्व असल्यास त्यांना प्रधान्य देण्यात येईल.
  • मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःचे चालू बँक खाते असणे गरजेचे आहे.

 

मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश

मित्रांनो सरकारचा कोणतीही योजना सुरू करण्यामागे एक उद्देश असतोच. जसे की मुख्यमंत्री व वयोश्री योजना ही योजना सुरू करण्याचा सरकारचा मुख्य उद्देश हा आहे की मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत वृद्धपकाळात असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना या योजनेतून 3000 रुपये मिळावेत व त्यातून ते आपल्या उपयुक्त आवश्यक जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकतील. जसे की, श्रवण यंत्र, कमोड असेल किंवा इतर कोणत्याही वस्तू आपण त्याच्या मदतीने खरेदी करू शकतो.

वृद्ध नागरिकांना स्वतःचा खर्च भागवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षांपुढील सर्व नागरिकांना 3000 रुपये देण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. तर मित्रांनो या योजनेसाठी सर्व 65 वर्षांपुढील नागरिक अर्ज करू शकतात. तुम्हाला देखील जर यासाठी अर्ज करायचा असेल तर त्याची पद्धत तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना आवश्यक कागदपत्रे (Documents)

  • आधार कार्ड 
  • मोबाईल क्रमांक 
  • जन्म प्रमाणपत्र 
  • बँक खाते पासबुक 
  • स्वयंघोषणापत्र 
  • राशन कार्ड 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • रहिवासी दाखला 

 

मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ

मुख्यमंत्री योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज सुरू करण्यासाठी आणखी पोर्टल सुरू केलेली नाहीये. परंतु यावरती कार्यवाही सुरू आहे. व लवकरच अर्ज स्वीकारण्यासाठी सरकार ऑनलाईन पद्धतीचे वेब पोर्टल सुरू करणार आहे. याद्वारे आपण सहज अर्ज करू शकतो. परंतु आणखीन महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणतेही ऑनलाइन प्रकाराचे पोर्टल सुरू केलेले नाही.

  • या योजनेअंतर्गत वरिष्ठ नागरिकांना 3000 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
  • प्रधानमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 60 वर्ष व 65 वर्षांपुढील सर्व नागरिकांना लाभ मिळणार आहे.
  • या मिळणाऱ्या रकमेमधून वृद्ध असणारे नागरिकांना गरजेचे साहित्य खरेदी करू शकतात.
  • महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 480 करोड रुपयांचे बजेट सादर केले आहे.
  • व या योजनेअंतर्गत राज्यातील 15 लाख पेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्याचे सरकारचे धोरण आहे.

 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा फायदा 

या मिळणाऱ्या पैशांमधून आपण कोन कोनत्या गोष्टी खरेदी करू शकतो त्याची सूची खालील प्रमाणे आहे.

  • कमोड खुर्ची 
  • काठ बेल्ट 
  • फोल्डिंग वॉकर
  • श्रवण यंत्र
  • चष्मा
  • स्टिक व्हील खुर्ची

मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज प्रक्रिया 

  • मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी टेबल मध्ये तुम्हाला खालील प्रमाणे एक लिंक दिलेली आहे. त्यामधून फॉर्म मोबाईल मध्ये सेव करा.
  • फॉर्म सेव्ह केल्यानंतर कोणत्याही प्रिंटरच्या दुकानातून एक त्याचे प्रिंट काढा.
  • त्यानंतर तो फॉर्म व्यवस्थित भरा फॉर्ममध्ये आपले नाव, आवश्यक असणारी कागदपत्रे, आवश्यक डिटेल्स आपला पत्ता, मोबाईल क्रमांक व इतर सर्व माहिती भरा.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स त्यासोबत जोडा जसे की आधार कार्ड, रहिवासी दाखला, जन्म प्रमाणपत्र किंवा इतर डॉक्युमेंट्स.
  • त्यानंतर तो व्यवस्थित भरलेला फॉर्म आपल्या जवळच्या समाज कल्याण विभाग या ठिकाणी जमा करा.

Mukhymantri Vayoshree Yojana Important Links

मुख्यमंत्री वयोश्री योजना फॉर्म पीडीएफ येथे क्लिक करा 
मुख्यमंत्री वयोश्री योजना जीआर इथे क्लिक करा 
मुख्यमंत्री वयोश्री योजना अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा 

Mukhymantri Vayoshree Yojana FAQ 

कोणत्या नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणार.?

  • महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ होईल

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा.?

  • वरील प्रमाणे फॉर्म लिंक दिली आहे. त्याची प्रिंट काढून तो फॉर्म व्यवस्थित भरा व जवळच्या समाज कल्याण विभागामध्ये हा फॉर्म जमा करा.

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख.?

  • सदर योजनेसाठी आणखी अंतिम तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये.

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकतो का.?

  • सरकार अर्ज स्विकारण्यासाठी लवकरच नवीन वेब पोर्टल लाँच करणार आहे. परंतु सध्या तरी या योजनेसाठी आपण ऑनलाइन अर्ज करू शकत नाहीत.

Leave a Comment