Namo Shetkari Yojana | नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

Namo Shetkari Yojana: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने भारत देशाबद्दल विविध प्रकारचे निर्णय तसेच काही शेतकऱ्यांसाठी योजना असतील यामधील मित्रांनो एक महत्त्वाकांशी ठरणारी योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना. या योजनेचा उद्देश घेऊन मित्रांनो महाराष्ट्र सरकारने या योजनेसारखेच एक सेम योजना सुरू केली होती. त्याचे नाव आहे नमो किसान शेतकरी सन्मान निधी योजनाm या योजनेअंतर्गत 2000 हजार रुपये पीएम किसान योजने प्रमाणेच शेतकऱ्यांना दिले जात असतात.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक नवीन आनंदाची बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच मित्रांनो केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. या दोन्ही योजना मित्रांनो शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला सुधारणा देण्यासाठी मोठी भूमिका बजावताना दिसत आहे.

नमो शेतकरी योजनेचा मुख्य उद्देश्य (Namo Shetkari Yojana)

नमो शेतकरी योजना ही एक महाराष्ट्र सरकारची खूप मोठी महत्वकांशी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की, शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मित्रांनो या विविध योजना भारत देशामध्ये तसेच महाराष्ट्र राज्य मध्ये राबवल्या जात आहेत. योजनेच्या पाचव्या हफ्त्याचे वितरण मित्रांनो सुरू झालेले आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. आता लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पावसाळ्याच्या हंगामात हा हप्ता येणार आहे. जेव्हा शेतकऱ्यांना बियाणे, खते किंवा इतर शेती संबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैशांची गरज असते त्यावेळेस हा हप्ता वितरण करण्यात येत असतो.

खालील प्रमाणे शेतकऱ्यांना आपली पात्रता तपासावी लागेल (Namo Shetkari Yojana Eligibility)

  • सर्वात अगोदर आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप वरील क्रोम ब्राउझर ओपन करा.
  • नंतर नमो शेतकरी योजनेची https://nsmny.mahait.org/FarmerLogin/Login वेबसाईट ओपन करा
  • त्यानंतर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसतील लाभार्थी स्थिती नोंदणी किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता यापैकी मित्रांनो कोणत्याही एका पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल हा ओटीपी त्या ठिकाणी पडताळा.
  • ही प्रक्रिया करून आपण आपल्या हप्त्याची स्थिती तसेच ही रक्कम कोणत्या बँकेत जमा झालेली आहे. याची संपूर्ण माहिती या प्रक्रियेद्वारे मिळवू शकतो.

पी एम किसान योजनेचा 18वा हप्ता. (pm Kisan Yojana 18th Installment)

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेबाबत तर आपल्या सर्वांना माहितीच असेल कारण की मित्रांनो ही योजना केंद्र सरकारची खूपच महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांना बियाणे, खते इत्यादि खरेदीसाठी प्रत्येक हप्त्यामध्ये 2000 रुपये दिले जात असतात. व या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वर्षाला 6000 रुपये जमा केले जातात.

मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेने वाट पाहत होते की पी एम किसान योजनेचा हप्ता कधी येईल. परंतु मित्रांनो मागील आठवड्याभरापूर्वी सरकारने पी एम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याबाबत एक मोठे अपडेट समोर आणले आहे. हे म्हणजे मित्रांनो पी एम किसान योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. व त्यांनी आपली ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. अन्यथा हा हप्ता जमा होणार नाही.

पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना (PM Kisan & Namo Shetkari Yojana)

  • या दोन्ही योजनांचा प्रभाव महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मकपणे आपल्याला दिसून येत आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदे होत आहेत. हे कोणते फायदे आहेत ते तुम्हाला खालील प्रमाणे लिस्ट द्वारे दाखवले आहेत.
  • मित्रांनो नियमित मिळणाऱ्या या रकमेमुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन खर्च भागवणे तसेच शेतीसाठी आवश्यक असणारी गुंतवणूक करणे. शेतकऱ्यांना आता सोपे जावू लागले आहे.
  • तसेच अनेक शेतकरी मित्रांना या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना रकमेचा उपयोग त्यांचा कर्जाचा भाग फेडण्यासाठी देखील होत आहे. ज्या शेतकऱ्यांवरती कर्जाचा बोजा आहे. ते या योजनेद्वारे कमी होताना दिसत आहे.
  • तसेच मित्रांनो आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, खते तसेच कीटकनाशके खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य होत आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीचे उत्पन्न देखील वाढत आहे.
  • शिक्षण आणि आरोग्य या योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांचा वापर अनेक शेतकरी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी व कुटुंबाच्या आरोग्यासाठी देखील करतात. त्यामुळे या योजनेअंतर्गत संपूर्ण कुटुंबाला फायदा होत आहे.

योजनांची अंमलबजावणी 

  • मित्रांनो देशातील बरेचसे नागरिक हे बनावट कागदपत्रांचा वापर करून सरकारसोबत स्कॅम करत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्याला ई-केवायसी ची प्रोसेस करण्यास वारंवार सांगण्यात येत आहे.
  • तुम्ही देखील जर या योजनेची आणखी ई-केवायसी केली नसेल तर ही करण्यासाठी तुमच्या जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन तुम्ही आपली ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने करू शकता.
  • तसेच मित्रांनो काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे हप्त्याचे वितरण जरा उशिरा देखील होऊ शकते. या समस्येवरती मात करण्यासाठी आर्थिक मजबूत तांत्रिक पायाभूत सुविधा यासाठी असणे गरजेचे आहे.

 

मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजना व नमो किसान योजनेचा खूप मोठा फायदा होताना पाहायला मिळत आहे. 5 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये पी एम किसान योजनेची रक्कम जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात देखील झालेली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Comment