Poultry Farm Business: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आज आपण एक व्यवसाय घेऊन आलो आहेत. त्याचं नाव आहे “कुक्कुटपालन” मित्रांनो कुक्कुटपालन एक लोकप्रिय व्यवसाय आहे. व प्रसिद्ध पारंपारिक व्यवसायिक आहे. म्हणूनच आपण अनेकदा पाहतो की कमीत कमी गुंतवणुकीमध्ये स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करू शकतो. त्याच्याबद्दलची माहिती आज आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो कोणत्याही व्यक्तीच्या मनात असा विचार चमकतो की आपण कमी गुंतवणूक मध्ये कोणता व्यवसाय चालू करू शकतो. तर मित्रांनो हा कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.
या व्यवसायाचे नावही त्यात शामील आहे जसे की “पोल्ट्री फार्म” जरी अनेकांना असे वाटत असेल की हा व्यवसाय सुरू करणे खूपच सोपे आहे पण जे हा व्यवसाय सोपा मानतात आणि कोणत्याही नियोजनाशिवाय सुरू करतात त्यांना या व्यवसायात अपयश मिळते. या कारणाने आज आपण तुमच्यासाठी एक ब्लॉग पोस्ट बनवली आहे. ज्याच्या माध्यमातून आज आपण तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज देणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला देखील इच्छा असेल की आपण देखील “पोल्ट्री फार्मिंग” व्यवसाय सुरू करावा. तर तुम्ही आजचा ब्लॉग पूर्ण वाचा.
मित्रांनो जरी सध्याच्या काळात बहुतेक लोक मांसाहारी आहेत आणि तसेच देशी-विदेशी बाजारपेठेत अंड्याची मागणी देखील नेहमीच वाढत असते हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो. आपण आज या लेखाच्या माध्यमातून या व्यवसायाची संबंधित माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो लोकांना या व्यवसायात अधिक उत्साह आपल्याला पाहताना मिळत आहे. या कारणाने आज आपण या व्यवसायाबद्दल माहिती पाहूयात. मित्रांनो हा व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही विशेष कौशल्याची व शिक्षणाची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे कोणताही बेरोजगार असो किंवा सुशिक्षित असो व अशिक्षित असला तरी देखील तो या व्यवसायामध्ये आपले पाऊल ठेवू शकतो. व चांगले उत्पन्न मिळू शकतो.
परंतु आपल्याला यामध्ये मेहनत करावी लागणार आहे. (Poultry Farm Business Hard Work)
कोणताही व्यवसाय करायचा म्हणले तर आपल्याला त्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट ही वेळेची द्यावी लागते. आपल्याला जास्तीत जास्त वेळ त्या व्यवसायाला द्यावा लागतो. तर मित्रांनो राज्याच्या कृषी विभागाकडून किंवा इतर कोणत्याही फार्म कडून काही आठवडे प्रशिक्षण घेऊन कुक्कुटपालन नावाचा हा व्यवसाय आपण सहज सुरू करू शकतो. एखाद्याची जर पोल्ट्री फार्म असेल किंवा कुक्कुटपालन असेल त्यामध्ये जाऊन आपण अधिक माहिती देखील मिळवू शकतो. जेणेकरून तुम्हाला त्याचा अनुभव येऊ शकेल. की तुम्ही कशाप्रकारे हा व्यवसाय सुरू करू शकता व यात खर्च किती लागणार आहे. इन्व्हेस्टमेंट किती तसेच सुरुवातीचा खर्च व यातून आपल्याला उत्पन्न कशाप्रकारे मिळू शकते. हे समजू शकेल तर मित्रांनो जरासा ही टाईम वाया न घालवता आपण सुरू करू व्यवसाय बद्दल सविस्तर माहिती पाहायला.
कुकुट पालन व्यवसाय कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणत केला जातो..?
मित्रांनो कुक्कुटपालन व्यवसाय हा कोणत्या ठिकाणी जास्त केला जातो याचे उत्तर आहे. मित्रांनो चिकन हे शहरी भागामध्ये व ग्रामीण भागामध्ये खूप जास्त याला मागणी आहे. परंतु शेतकरी मित्रांनो कुक्कुटपालन व्यवसाय हा प्रमुख ग्रामीण भागामध्ये केला जातो. कारण की ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त कोंबड्यांना जागा असते. व ते विविध प्रकारचे शेड बांधून त्यामध्ये कोंबड्या ठेवू शकतात. व कोंबड्यांना योग्य ते पदार्थ देऊन त्यांची वाढ केली जाते. व ते पक्षी नंतर शहरी भागांमध्ये पोहोच केले जातात. तर मित्रांनो या व्यवसायाला खूपच मागणी आहे. म्हणजेच हा व्यवसाय ग्रामीण भागामधून शहरी भागाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप सारे नागरिक आता शहरी भागांमध्ये देखील हा व्यवसाय सुरू करत आहेत. परंतु प्रामुख्याने हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे.
सर्वात प्रथम कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण घ्यावे. (Poultry Farm Business Experience)
मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने किंवा उद्योजकाने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला असेल किंवा करायचं असेल तर त्याला या व्यवसायातील आव्हाने आणि अडचणी समजून घेण्यासाठी प्रशिक्षण घ्यावी लागणार आहे. हे प्रशिक्षण तुम्हाला कोणत्याही फार्ममध्ये दिले जाऊ शकते. अनेक पोल्ट्री उद्योजक नवीन उद्योजकांना प्रशिक्षण कार्यक्रम देतात जरी उद्योजकांना प्रशिक्षणाच्या बदलत काही फी भरावी लागली तरी तो भरण्यास तयार असतो. परंतु मित्रांनो ग्रामीण भागामध्ये खूप सारे नागरिक हे मराठी उद्योजकाकडून फी घेत नाही. त्यांच्याकडे जाऊन देखील तुम्ही प्रशिक्षण कशाप्रकारे कार्य करते हे प्रशिक्षणाद्वारे तुम्हाला समजू शकेल. जसे की यामध्ये खर्च किती आहे. याची योग्य ती काळजी तुम्ही पक्षांची कशाप्रकारे घेऊ शकता. याचे सर्व प्रशिक्षण तुम्हाला गरज लागणार आहे.
याशिवाय कृषी विज्ञान केंद्र आणि खादी ग्राम उद्योग अशा विविध ठिकाणाहून तुम्हाला प्रशिक्षण मिळू शकेल. मित्रांनो हे प्रशिक्षण फक्त व्यवहारी ज्ञानासाठी नाही तर तुम्हाला यातील कोणत्या आव्हानांना समोर जावे लागेल यासाठी आहे. आपल्याला तर माहितीच आहे.व्यवसायामध्ये सध्या खूप स्पर्धा वाढतात हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रशिक्षणाची अत्यंत गरज लागणार आहे. कारण की तुमच्याकडे जर कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसेल तर तुम्हाला समजू शकणार नाही. की हा व्यवसाय कसा चालतो याला कसे चालवावे लागते. व पक्षांची काळजी तुम्ही कशाप्रकारे घ्याल अडचणी तसेच नफा या द्वारे तुम्हाला समजू शकेल. यामुळे तुम्ही हे डोक्यातून काढून टाकावे की आपण कोणाकडे प्रशिक्षण घेण्यासाठी गेल्यावर ते फक्त आपल्याला व्यावहारिक ज्ञान शिकवतील तर मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळतील.
कोंबड्यांचा प्रकार कसा निवडावा (Poultry Farm Business How To Choose Hens)
मित्रांनो उत्पन्नामध्ये तुम्ही दोन प्रकारचे कुक्कुटपालन करू शकता. एक आहे गावरान कोंबडी पालन दुसरे आहे ब्रॉयलर कुक्कुटपालन मित्रांनो यामधील तुम्ही कोणत्याही कोंबड्यांचा प्रकार निवडू शकता. कोंबडीच्या प्रकाराबाबत कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीस मांस उत्पादनासाठी किंवा अंडी उत्पादनासाठी कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे. हे अगोदर ठरवावे लागेल कारण जर उद्योजकाला हा व्यवसाय प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी सुरू करायचे असेल तर त्याला लेयर म्हणजेच गावरान कोंबडीचा फार्म सुरू करावी लागेल. जर उद्योजकाला प्रामुख्याने मांस उत्पादन करायचे असेल तर त्याला ब्रॉयलर चिकन फार्म उघडावे लागेल.
यामुळे तुम्ही आधीच ठरवावे आपल्याला कोंबड्या विकून पैसे कमवायचे आहेत की अंडी विकून नंतर ब्रॉयलर आणि लेयर पोल्ट्री फार्म दोन्हीचे स्वतःचे वेगळे फायदे आणि तोटे देखील आहेत. याबाबत प्रशिक्षणात सांगितले जाऊ शकते. याचा अर्थ असा आहे की कोंबडीचा प्रकार निवडण्याआधी उद्योजकाने त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा करावी व अधिकृत माहिती घेणे आवश्यक आहे. हे आपल्या डोक्यात असावे तथापि जर उद्योजकाची इच्छा असेल तर तो लेयर आणि बॉयलर दोन्ही आपल्या व्यवसायाचा भाग बनवू शकता. व दोन्ही कोंबड्या पालन करू शकता व त्याची देखभाल करून त्या कोंबड्या विकू शकतात.
परंतु मित्रांनो तुम्हाला अंडी आणि मांस दोन्ही तयार करायचे असेल तर या दोन्ही कोंबड्या तुम्ही ठेवाव्यात परंतु जर तुम्हाला फक्त कोणत्याही एकाच व्यवसायावरती अवलंबून राहायचे असेल जसे की तुम्हाला जर चिकन वरती अवलंबून राहायचे असेल तर तुम्हाला बॉयलर कोंबड्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे. आणि तुम्हाला जर अंड्यांवर अवलंबून राहायचे असेल तर तुम्ही गावरान कोंबड्यांचा व्यवसाय सुरू करू शकता.
कुकुट पालन व्यवसाय करण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा (Poultry Farm Business Main Point)
मित्रांनो तुम्ही जर कोंबड्यांचे सिलेक्शन केले असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. की कोंबड्यांना खाद्यपदार्थ कोणकोणते द्यायचे आहेत. त्याच्याबद्दलची देखील तुम्हाला माहिती लागणार आहे. व तुम्हाला याच्यासाठी शेड साठी देखील लागेल थोडाफार खर्च लागणार आहे. जसे की तुम्हाला त्या शेडमध्ये किती कोंबड्या ठेवायच्या आहेत. याच्यावरून आपल्याला शेड खर्च अंदाज लावावा लागणार आहे. मांस नेऊन विक्री करावी लागणार आहे. हे देखील माहीत असणे आधीच आवश्यक आहे.
तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला 10 ते 12 लाख रुपयांपर्यंतचा खर्च लागणार आहे. पण तरी उद्योजकाला कुकूटपालन व्यवसाय स्तरावर सुरू करायचे असेल. तर तुम्हाला याच्यावरती अवलंबून राहावी लागेल असे नाही. तुम्हाला जास्त कोंबड्या ठेवायचे असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर अधिक जमीन तसेच मोठे शेड बांधाव लागणार आहे. यासाठी अधिक पक्षी खरेदी करणे आवश्यक आहे. मग याच्यासाठी खर्च देखील जास्त होण्याची शक्यता आहे.
परंतु तुम्हाला कमी खर्चामध्ये सुरू करायचं असेल तर तुम्ही कमीत कमी जमीन घेऊन कमीत कमी शेड द्वारे कमीत कमी पक्ष्यांसोबत हा व्यवसाय सुरू करू शकतात. नंतर तुम्हाला जास्त नफा होत आहे असे जर समजले तर तुम्ही शेड वाढवू देखील शकता. मग हा खर्च देखील आपल्याला कमी वाटायला सुरुवात होतो. व आपण यातून चांगले उत्पन्न मिळाल्यावर ती नवीन शेड बांधू शकतो वरनमूद केलेली रक्कम ही व्यवसाय सुरू करण्यासाठी मध्यम स्वरूपाची रक्कम आहे. एवढ्या रक्कमे मधून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
कोंबड्यांसाठी जमीन व राहण्याची व्यवस्था कशी करावी
मित्रांनो कोंबड्यांसाठी आपल्याला जागा घेऊन जमिनीची व्यवस्था करणे ही खूप मोठी महत्त्वाची पायरी आहे. मित्रांनो लक्षात घ्या की अनेक उद्योजक हा व्यवसाय कुठेही सुरू करतात. पण मित्रांनो हा व्यवसाय तुम्ही कोणत्याही ठिकाणी सुरू करू शकत नाही. म्हणजेच तुम्हाला तुमच्या निवासी भागात शेजारच्या लोकांना एनओसी शिवाय हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकत नाही. कारण कोंबडी एक मित्रांनो विचित्र प्रकारचा वास सोडते जे लोकांना आवडत नाही. त्यामुळे उद्योजकाचे रहिवासी क्षेत्रापासून खूप जास्त अंतरावर जमीन असल्यास उद्योजक त्या ठिकाणी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करू शकतो.
तुमच्या भागात जर एखादी वस्ती किंवा तुम्ही गावात राहत असाल तर गावाच्या बाहेर तुम्ही हा व्यवसाय सुरू करा. जेणेकरून कोणत्याही नागरिकांना याच्या वासापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ शकणार नाही. ही काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. उद्योजकाची जर इच्छा असू शकेल तर मित्रांनो तो त्याच्या शेतात उत्पादित केलेले उत्पन्न त्या भागात असलेल्या ठिकाणी देखील सुरू करू शकतो. व बाजारपेठेमध्ये तो परिपक्व झालेल्या पक्षी विक्रीसाठी पाठवू शकतो.
परंतु तरीही उद्योजक आणि त्या भागात असलेल्या आधीच अस्तित्वात असलेल्या शेतांच्या आणि त्या क्षेत्रातील उपलब्ध मागणीचे विश्लेषण करूनच जागा आणि जमीन निवडणे योग्य मानले जाते. ज्या जागेवरती उद्योजकाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्या जागेवरती रस्त्या उपलब्ध असावा वीज व पाण्याची योग्य व्यवस्था असायला पाहिजे. कारण कोंबड्यांना योग्य वेळी पाणी देणे खूपच आवश्यक लागणार आहे. यासाठी तुम्ही विहीर किंवा बोअर देखील खोदू शकता.
मित्रांनो सूर्यप्रकाश व प्राणी इत्यादींपासून पक्षांचे संरक्षण करण्यासाठी निवासस्थानापासून तुम्हाला चिकन फार्म आणि फ्री रेंज चिकन फार्म यापैकी एक आपण निवडू शकतो. व राहण्याची पक्षांची व्यवस्था करू शकतो याशिवाय उद्योजकाला चिकन फार्म मध्ये वापरण्यात येणारी अनेक उपकरणे जसे की भांडी खरेदी करावी लागतात. ज्याचा उपयोग पक्षांना खाद्य पाणी साफसफाई आणि काळजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. यासाठी तुम्हाला भांडीखरेदी करावी लागणार आहे. याची माहिती तुम्हाला एखाद्या पोल्ट्री उद्योजकाकडून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये योग्य माहिती मिळू शकेल. कृपया व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एखाद्या जवळील पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या तरुणाकडे जाऊन माहिती मिळवु शकता.