New Bajaj Chetak launched: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील जर एक इलेक्ट्रिक बाइक घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो बजाज ने आता आपली एक नवीन व्हर्जन सोबत इलेक्ट्रिक टू व्हीलर गाडी लॉन्च केली आहे, व याची स्टार्टिंग एक्स शोरूम प्राईज 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत आहे. आणि बजाज च्या या दुसऱ्या व्हेरिएंट ची किंमत ही 1 लाख 27 हजार रुपये एक्स शोरुम price आहे. तुम्ही देखील जर इलेक्ट्रिक टू व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही बाईक नक्कीच खरेदी करू शकता.
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी बद्दल माहिती (New Bajaj Chetak Scooter Battery Info.)
बजाज चेतक च्या या बाईक मध्ये आपल्याला मेटॅलिक बॉडी मिळते. तसेच सर्कुलर हेड लॅम्प सुद्धा दिलेले आहेत.तसेच इंटिग्रेटेड इंडिकेटर सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत. ही बाईक मिडल क्लास कुटुंबातील नागरिक देखील खरेदी करू शकतात. या बाईकची किंमत खूप कमी आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही बाईक 150 km पर्यंत आपल्याला आरामात पोहचवू शकते. झिरो ते 80% ही बाईक चार्ज होण्यासाठी फक्त 3 तास लागतात. चार्जिंग स्पीड देखील यामध्ये आपल्याला फास्ट देण्यात आलेले आहे.
मित्रांनो बजाज ने या चेतक बाईकला क्लासिक लूक ठेवला आहे, व यामध्ये पूर्ण डिझाईन चेंज केली आहे. यामध्ये आपल्याला 3.5 kWh बॅटरी थेट फ्लोअर बोर्ड मध्ये दिलेली आहे. यामुळे बजाजला बूट मधील जागा मोकळी करण्यासाठी सोपे झाले आहे. तसेच यामध्ये जी नवीन बॅटरी देण्यात आली आहे ती 3 किलो ने हलकी आहे व ती अधिक बॅटरी बॅकअप देते.
बजाज चेतक इलेक्ट्रिक बाइक बद्दल इतर माहिती
मित्रांनो बजाज चेतक इलेक्ट्रिक बाइक ला 4kW मोटर मिळते. तसेच बेस्ट स्पेक वेरीएंट 63 किलोमीटर प्रतितास च्या टॉप स्पीड वरती जाऊ शकते. तसेच टॉप एंड मॉडेल 73 किलोमीटर प्रति तास पर्यंत टॉप स्पीड आहे. तसेच बजाजचा असा देखील दावा आहे की त्याची रेंज आता 153 किलोमीटर एकदा चार्ज केल्यानंतर आहे. पण आपण 125 किलोमीटर पर्यंत रेंज पकडू शकतो. आणि याची चार्जिंग स्पीड देखील खूप फास्ट करण्यात आलेली आहे. फक्त 3 तासांमध्ये आपण याला फुल चार्ज करू शकतो.
Bajaj Chetak 3501 specification
Ex Showroom Price | ₹ 1,27,243/- |
कंपनीच्या मते रेंज | 153km |
बॅटरी चार्जिंग टाईम | 3 तास |
बॅटरी क्षमता | 3.5 kWh |