---Advertisement---

Pan Card 2.0: आता पॅन कार्ड वर येणार QR Code काय होणार याचा वापर पाहा सविस्तर माहिती

By aadarshmarathi.com

Updated on:

Follow Us
---Advertisement---

Pan Card 2.0: नमस्कार मित्रांनो, पॅन कार्ड चा वापर बऱ्याच ठिकाणी होतो जसे की बँक अकाउंट ओपन करण्यासाठी तसेच कोणताही फॉर्म भरण्यासाठी पॅन कार्डचा वापर होतो. तसेच विविध सरकारी किंवा खाजगी कामांसाठी आपण पॅन कार्ड व आधार कार्ड चा वापर करत असतो. परंतु याच पॅन कार्ड मध्ये आता केंद्र सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात आला आहे. तो बदल कोणता आहे, याबाबत सविस्तर माहिती व अपडेट आपण जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारने मागील काही दिवसांमध्ये पॅन कार्ड मध्ये बदल केला आहे तो बदल कोणता ते पाहूया.

पॅन कार्ड म्हणजे काय? 

तर मित्रांनो बऱ्याच लोकांना माहित नाही की पॅन कार्ड म्हणजे काय तर पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर. हे पॅन कार्ड आयकर विभागाकडून जारी केले जाते मुख्यात हे पॅन कार्ड आर्थिक कामासाठी देखील वापरले जाते. जसे की आयकर भरने, बँक खाते उघडणे किंवा मालमत्ता खरेदी करणे पॅन कार्ड वरती दहा अंकी क्रमांक असतो. ज्यामध्ये तुमच्या आर्थिक व्यवहाराबद्दलची संपूर्ण माहिती नोंदवली जाते. जसे की तुम्ही किती कर भरता यात तुमची किती गुंतवणूक आहे किंवा इतर सर्व आर्थिक माहिती आपली पॅन कार्ड मध्ये नोंदवलेली असते.

पॅन कार्ड मध्ये झाला बदल (Pan Card 2.0)

मित्रांनो आता जे नवीन पॅन कार्ड येणार आहेत. त्यामध्ये आपल्याला क्यू आर कोड पाहायला मिळणार आहे. पण जो आपला पॅन कार्डचा पॅन नंबर होता तो पॅन नंबर जुन्या पॅनचा व नवीन पॅन कार्डचा तो सेम राहणार आहे. त्याच्या नंबर मध्ये कोणतीही माहिती चेंज केली जाणार नाही. फक्त पॅन कार्ड वरती एक क्यूआर कोड ऍड केला जाणार आहे. केंद्र सरकारने पॅन कार्ड सुरक्षित करण्यासाठी हा नियम जारी केलेला आहे, व आता येथून पुढे जे पॅन कार्ड येतील त्यावरती लवकरच क्यू आर कोड येणार आहे.Pan Card 2.0

सरकार का आणत आहे नवीन पॅन कार्ड? (Pan Card 2.0)

मित्रांनो केंद्र सरकारने पॅन 2.0 लॉन्च करण्याबाबत निर्णय जारी केला आहे. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णवी यांच्या मते पॅन 2.0 हा प्रकल्प एक इ गव्हर्नन्स उपक्रम आहे. ज्याचा उद्देश असा आहे की पॅन कार्ड ला सुलभ आणि सुरक्षित करणे. तसेच पॅन कार्ड प्रिंट करणारे सॉफ्टवेअर अपडेट करणे. पंधरा-वीस वर्षे जुनी सॉफ्टवेअर आता अपडेट करण्यात आली आहे. सरकार आता कर दात्यांना एक चांगला अनुभव देऊ इच्छित आहे. त्यामुळे पॅन 2.0 हा प्रकल्प लॉंच केला आहे, व तो लवकरच जारी देखील केला जाणार आहे.

कसे मिळणार नवीन पॅन कार्ड? 

मित्रांनो जर तुमच्याकडे आधीपासूनच एक जुनं पॅन कार्ड असेल तर तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला नवीन पॅन कार्ड लवकरच मिळणार आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. ते तुमच्या पत्त्यावरती वितरित केले जाणार आहेत. परंतु तुमच्याकडे जर पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला डिजिटल पॅन कार्ड साठी किंवा फिजिकल पॅनकार्ड साठी अर्ज करावा लागेल. तरच तुम्हाला ते नवीन पॅन कार्ड मिळणार आहे. परंतु तुमच्याकडे जर आधीपासूनच एक जुने पॅन कार्ड असेल तर तुमच्या पत्त्यावरती नवीन पॅन कार्ड पोहोचेल.

---Advertisement---

Leave a Comment