Farmer Id: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील जर शासकीय योजनांचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो आता तुम्हाला फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. जसे की आधी आपण थेट योजनांचा लाभ घेऊ शकत होत. परंतु मित्रांनो तुम्हाला जर आतापासून योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण अर्ज कसा करू शकतो व फार्मर आयडी काय आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
फार्मर आयडी म्हणजे काय? (Farmer Id)
मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न असेल की “फार्मर आयडी” म्हणजे काय तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र सरकारने कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. मित्रांनो फार्मर आयडी योजना अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. ज्याच्या मदतीने आपण विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो. फार्मर आयडी ही एक युनिक ओळख क्रमांक प्रणाली असणार आहे.
फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकरी विविध योजनांचा लवकरात लवकर लाभ घेऊ शकतील जसे की, पिक विमा योजना असेल पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, सिंचन योजना अशा विविध योजनांचा लाभ शेतकरी या फार्मर आयडीच्या स्वरूपातून घेऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी अर्ज करणे आणखीन सोपे होणार आहे. कारण याद्वारे व्हेरिफिकेशन प्रक्रिया लवकरात लवकर होईल व शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीसाठी ऑनलाईन नोंदणी देखील करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे.
फार्मर आयडी कसा तयार करायचा? (Farmer Id)
मित्रांनो आपल्याला तर आता माहिती झाले असेल की फार्मर आयडी म्हणजे काय. तर मित्रांनो ही farmer Id आपण कशाप्रकारे तयार करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची झाल्यास शेतकऱ्यांनी गावोगावी ज्या ठिकाणी कॅम्प होतात त्या कॅम्पमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या सोबत सातबारा उतारा तसेच आपले आधार कार्ड व आधार कार्ड सोबत लिंक असणारा मोबाईल नंबर असणे आपल्याकडे गरजेचे आहे. 16 डिसेंबर पासून मित्रांनो या योजनेची सुरुवात केली आहे. गावागावांमध्ये हे कॅम्प लावण्यात येणार आहेत. तेथे शेतकऱ्यांना फार्मर आयडीबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
फार्मर आयडी चा काय होणार फायदा? (Farmer Id)
मित्रांनो फार्मर आयडी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लवकरात लवकर लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. आपल्याला तर माहितीच असेल की केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी व डिजिटल क्षेत्रात उत्क्रांती करण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत आहे. परंतु डिजिटल क्षेत्र जर वाढवायचे असेल तर शेतकऱ्यांना देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही देखील लवकरात लवकर आपली फार्मर आयडी काढावी जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. कारण की याच्या माध्यमातून आपण विविध योजनांचा लाभ लवकरात लवकर घेऊ शकतो. तुम्हाला देखील जर फार्मर आयडी बनवायचे असेल तर गावोगावी होणाऱ्या कॅम्पमध्ये आपल्याला सहभागी व्हावे लागणार आहे.







