---Advertisement---

Ladaki Bahin Yojana 2025: लाडकी बहीण योजनेत अर्जांची होणार फेर तपासणी, कधी पासून मिळणार 2100 रुपयांचा हप्ता

By aadarshmarathi.com

Published on:

Follow Us
---Advertisement---

Ladaki Bahin Yojana 2025: महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी एक योजना सुरू केली होती. त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात येत होते. परंतु मित्रांनो महिलांना नोव्हेंबर पर्यंतचे सर्व पैसे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील करण्यात आले होते. परंतु मित्रांनो सरकारच्या जेव्हा लक्षात आले की काही महिला बनावट अर्ज करून देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. तेव्हा सरकारने मोठे ॲक्शन घेण्यास सुरुवात केली आहे. याबाबत माहिती आपण जाणून घेणार आहोत.

लाडकी बहिण योजनेत होणार पुन्हा अर्ज तपासणी (Ladaki Bahin Yojana 2025)

मित्रांनो काही नागरिक हे बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड व बँक खाते बनवून या योजनेचा लाभ घेत होते, व ते लक्षात आल्याकारणाने यामध्ये आता पुन्हा लाडक्या बहिणींची महिलांची अर्जाची फेर तपासणी करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, व सर्व महिलांचे अर्ज पुन्हा तपासण्यात येणार आहेत. त्यामुळे या योजनेला अधिक पारदर्शकता येईल असा देखील मित्रांनो सरकारचा विश्वास आहे. यामध्ये ज्या महिला बनावट अर्ज करून लाभ घेत होत्या त्या महिलांवर कारवाई देखील केली जाऊ शकते. Ladaki Bahin Yojana 2025

कोणत्या महिलांचे अर्ज होणार बाद?

ज्या नागरिकांनी किंवा महिलांनी बनावट कागदपत्रे बनवून अर्ज केले होते व ज्या महिलांचे अर्ज अप्रू झाले होते. परंतु ज्या महिला या योजनेसाठी पात्र नव्हत्या अशा महिलांचे अर्ज पुन्हा तपासले जाणार आहेत. त्यामुळे ज्या महिला बनावट कागदपत्रे वापरून अर्ज करत होत्या त्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत. व त्या महिलांना या योजनेमधून हटवण्यात येणार आहे. व ज्या महिलांचे अर्ज हे ओरिजनल होते त्या महिलांना कोणत्याही प्रकारची घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण की पुढील सर्व हप्ते त्या पात्र महिलांना मिळणार आहेत. Ladaki Bahin Yojana 2025

पुढील हप्त्याला मिळणार का 2100 रुपये रक्कम 

मित्रांनो भाजप सरकारने लाडक्या बहिणींना निवडणुकीदरम्यान आश्वासन दिले होते की महायुती सरकार जर आले तर आपण महिलांच्या खात्यात 1500 रुपयां ऐवजी 2100 रुपये रक्कम टाकण्यास सुरू करणार आहोत. त्यामुळे बऱ्याचश्या महिलांनी महायुती सरकारला मतदान देखील केले होते, (Ladaki Bahin Yojana 2025) व त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे महायुती सरकारने पुन्हा एकदा घोषणा केली आहे, की ही रक्कम लगेच सुरू होणार नाही. तरी ही रक्कम एप्रिल महिन्यापासून महिलांच्या खात्यात 2100 रुपये प्रत्येक महिना सुरू होणार आहे. एप्रिल महिन्यापर्यंत जे लाडकी बहिणी योजनेचे हप्ते येतील ते 1500 रुपये असतील एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये हप्त्यास सुरुवात होणार आहे.

अर्जाची फेर तपासणी 

अर्जाची पुन्हा फेर तपासणी होणार आहे. यामध्ये एकूण 2 कोटी महिलांनी अर्ज केले होते. या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत परंतु यामध्ये काही महिलांनाच लाभ मिळणार आहे. कारण की बरेच अर्ज हे चुकीचे असल्याकारणाने ते अर्ज बाद होणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकार याकडे अधिक लक्ष देत असून ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना लाभ मिळणार आहे व ज्या महिला या योजनेत अपात्र आहेत त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. Ladaki Bahin Yojana 2025

---Advertisement---

Leave a Comment