Clothes Business : कापड व्यवसाय कसा सुरू करावा संपूर्ण माहिती

Clothes Business: नमस्कार मित्रांनो, मार्केटमध्ये सध्या खूप सारे व्यवसाय उपलब्ध आहेत. परंतु कमीत कमी गुंतवणुकीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून देणारा व्यवसाय हे फार कमी प्रमाणात असतात. परंतु आज आपण तुम्हाला एका अशा व्यवसाय बद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा नक्कीच मिळवू शकता. तर मित्रांनो आपण बोलतोय “कापड व्यवसायाबद्दल” Clothes Business मित्रांनो कापड व्यवसाय जर आपल्याला वाटत असेल की यामध्ये खूप सारे लोक उतरले आहेत. व हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात केला जातो व यामध्ये खूप सारी मेहनत लागते तर मित्रांनो तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. कारण की, कापड व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे. ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये पैसे कमवण्याची संधी उपलब्ध आहे. आणि तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त फायदा करू शकता. याची सविस्तर माहिती आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

कापड व्यवसायाचे क्षेत्र किती मोठे आहे..?

मित्रांनो भारतीय वस्त्रोद्योग सतत वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याचे कापड व्यवसायाचे मूल्य हे US$85 बिलियन एवढी आहे. व येत्या काही वर्षांमध्ये याचे मूल्य हे US$190 बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही अजून देखील तुमच्या व्यवसाय सुरू केला नसेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही खूपच कमी गुंतवणुकीमध्ये चांगले प्रॉफिट या व्यवसायाच्या मदतीने व्यवसायाच्या माध्यमातून काढू शकता. याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूया.

कोणत्या प्रकारचे व्यवसाय आपण सुरू करू शकतो

मित्रांनो तसं पाहिलं तर आपण कापड व्यवसायामध्ये देखील बऱ्याच प्रकारचे कापड निर्मिती व्यवसाय व इतर व्यवसाय देखील सुरू करू शकतो. ज्यामध्ये उत्पादन म्हणजे कापड निर्मिती करणे. हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. दुसऱ्या व्यवसाय म्हणजे आयात व निर्यात म्हणजे एका कडून विकत घेणे व दुसरीकडे पोहोच करणे. तसेच किरकोळ विक्री देखील आपण करू शकतो. ज्या ठिकाणी आपण दुकान टाकून देखील विक्री करू शकतो. या बऱ्याच प्रकारचे व्यवसाय देखील तुम्हाला कापड उद्योग धंद्यामध्ये पाहायला मिळतात. यामधील आपल्याला जो सोपा पर्याय वाटेल. तो आपण यामध्ये निवडू शकतो. व आपला कापड व्यवसाय देखील सुरू करू शकतो.

व्यवसायाचे नियोजन कसे करावे (how to plan business)

मित्रांनो जर पाहायला गेले की तुम्ही कापड व्यवसायाचे नियोजन कशाप्रकारे करू शकता. तर यामध्ये तुम्हाला व्यवसायाची सर्वात अगोदर नोंदणी करावी लागणार आहे. व परवाना मिळवावा लागेल. तसेच गुंतवणूक देखील तुम्हाला व्यवस्थापित करावे लागणारे. योग्य तेवढी गुंतवणूक करा. तसेच एक चांगले स्थान शोधा व स्टॉक मिळवून यंत्रसामान्य आणि मनुष्यबळ तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. तसेच तुमचा संपूर्ण व्यवसाय तुम्ही सेट करा नंतर तुमच्या व्यवसायाची तुम्ही विविध प्रकारे जाहिरात करू शकता. व एक भव्य व मोठे उद्घाटन करा जेणेकरून सर्वत्र माहिती पोहोचेल की दुकान चालू झाले आहे.

मित्रांनो आपले कोणतेही काम असले तरी आपण त्यामध्ये नियोजन केलेच पाहिजे. कारण कोणतेही संघर्ष किंवा गैर व्यावहारण त्या ठिकाणी होणार नाही. कापडाचे व्यवसाय जर तुम्हाला पण सुरू करायचे असेल तर आधीच नियोजन करताना काय समाविष्ट करावे असा प्रश्न जर तुम्हाला पडला. तर व्यवसाय योजना हा तुमच्या व्यवसायाचा सारांश आहे. म्हणून प्रथम तुम्ही प्रत्येक आपल्या जी काही गोष्ट मनात येईल ती गोष्ट एका ठिकाणी टिपून घ्यावी नंतर तुम्ही केलेल्या लिस्ट मधील संपूर्ण माहिती तुम्ही पहावी जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्यवसाय बद्दल अधिक माहिती व ज्ञान मिळेल.

व्यवसायाची नोंदणी कशी करावी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या व्यवसायाचे नियोजन केले असेल तर त्याबरोबर तुम्हाला व्यवसायाची नोंदणी करणे देखील गरजेचे असते. तुमचे व्यवसायाचे प्रमाणपत्र आणि प्रकार यावरून तुम्ही आपल्या व्यवसायाची नोंदणी करू शकता. जसे की खाजगी मर्यादित संस्था आयात निर्यात व्यवसाय कच्चामाल व्यवसाय किरकोळ आयात व्यवसाय अशा प्रकारचे भरपूर व्यवसाय आहेत. यामध्ये तुम्हाला नोंदणी करण्याची आवश्यकता असते. जेणेकरून तुम्हाला सर्वत्र जाहिरात करता येईल की हा व्यवसाय असा आहे. आपण टाकलेला आहे. तुम्हाला जर कापडांची आवश्यकता असेल. तर तुम्ही होलसेल रेटमध्ये घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे मित्रांनो विविध प्रकारच्या जाहिरातीचा तुम्हाला करावे लागणार आहेत.

व्यवसायाचा परवाना मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील नोंदणी करू शकता. किंवा कोणत्याही ऑनलाइन कॅफे दुकानात जाऊन देखील तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करू शक.ता व तुम्हाला जीएसटी प्रमाणपत्र लागणार आहे. याची आपण अधिक माहिती पाहूया……

जीएसटी प्रमाणपत्र बद्दल माहिती (GST Certificate Information) 

मित्रांनो तुमच्या डोक्यात जर कापड व्यवसाय करण्याचा प्लॅन असेल तर तुम्हाला जीएसटी प्रमाणपत्र लागणार आहे. कारण ट्रेडमार्क नोंदणी तुमच्या ब्रँड नावाची संरक्षण करण्यासाठी व इतर परवाना व कारखाना परवाना देखील तुम्हाला लागणार आहे. उत्पादन व्यवसायासाठी नोंदणी तसेच दहापेक्षा जर जास्त (10+ Employees) कर्मचारी असतील. तर त्यांची नोंदणी देखील तुम्हाला करावी लागेल. तसेच सर्व परवाने व परवानगी तुम्हाला मिळाले असतील तर तुम्हाला मोठमोठ्या कायद्या पासून व दंडांपासून बचावता येते. तसेच जीएसटी असेल तर तुम्हाला टॅक्स बद्दल देखील इतर माहिती त्या ठिकाणी ठेवता येते. टॅक्स देखील वाचतो.

गुंतवणूक व्यवस्थापित करणे बाबत (Regarding managing investments)

मित्रांनो हा जर व्यवसाय आता तुम्हाला सुरू करायचा असेल तर व्यवसायाच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यामध्ये पैसे मिळवणे व त्याच्या योग्य वापर होईल हे तुम्हाला करणे गरजेचे आहे. गुंतवणूक करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. यामुळे तुम्ही तुमचा बराचसा वेळ यामध्ये देऊ शकता. तुम्हाला या निधीचे देखील व्यवस्थापन करावे लागेल. की कोणत्या ठिकाणी कसा निधी लागेल, जसे की मुख्य जो खर्च असणार आहे. कापड खरेदीसाठी खर्च इतर बिलिंग पगार यंत्रसामग्री साठा व छुपा खर्च लागणार आहे.

एक योग्य स्थान शोधा (find a good location)

मित्रांनो कापड व्यवसायाच्या उद्योगधंद्यामध्ये सुरळीत कामकाज स्थान नेहमीच आपल्याला चांगली भूमिका बजावते. तुमच्या संसाधनाच्या जे जवळ स्थान (Choose A Best Place) असेल ते स्थान तुम्ही निवडू शकता. तसेच ग्राहकांना प्रवेश करणे योग्य तरी स्थान असणे गरजेचे आहे. तुम्हाला जर त्या ठिकाणी व्यवसाय स्थापित करायचा असेल. तर तुम्हाला त्या बाजाराचे देखील विश्लेषण करावे लागणार आहे. की तिथे कोणत्या प्रकारचे लोक येतात व कशासाठी येतात. त्या ठिकाणी आपले दुकान टाकले तर चालू शकेल का…? हे देखील माहीत असणे आपल्याला गरजेचे आहे.

चांगला उत्तम कॉलेटीचा स्टॉक निवडा (Choose Best Quality Stocks) 

मित्रांनो हा उद्योग धंदा करण्यापूर्वी तुम्हाला चांगला व दर्जेदार स्टॉक निवडणे गरजेचे आहे. तसेच कच्चा माल व फॅब्रिक खरेदी देखील तुम्ही चांगल्या प्रमाणे निवड करू शकता. फॅशन व सध्याची मार्केटमधील मागणी यावर देखील तुम्हाला अवलंबून राहावे लागणार आहे. जेणेकरून तुम्हाला समजू शकेल की सध्या कोणता ट्रेण्ड आहे. यावरून तुम्ही कच्चा माल व पक्का माल निवडू शकता. व आयात निर्यात करू शकता. तसेच उत्पादकांशी थेट संपर्क देखील तुम्ही घेऊ शकता. व त्यांच्याकडून डायरेक्ट माल खरेदी करू शकता.

उत्पादकांशी संपर्क कसा करावा (How to contact manufacturers)

मित्रांनो तुम्ही कापड डायरेक्ट खरेदी करू शकता व तुम्ही थेट संपर्क साधू शकता गुणवत्ता व सर्वात कमी किमतीमध्ये नमुने तपासल्यानंतर तुम्ही कारखान्यामधून माल (Stocks) खरेदी करू शकता. किरकोळ विक्रेत्यांकडून किंवा किरकोळ विक्रेत्यांसाठीच तुम्ही दर्जेदार उत्पादने खरेदी करण्यासाठी चांगले व योग्य उत्पादक विक्रेते शोधण्यासाठी कष्ट करावे. जेणेकरून तुम्हाला चांगले व्यासपीठ सापडू शकेल. व चांगले उत्पादक मिळतील. जेणेकरून तुमच्या दुकानाची देखील जास्त प्रमाणात उत्पन्न वाढेल.

यंत्र व कामगार (machinery and labour)

मित्रांनो हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे यंत्रसामगणी तसेच कामगार देखील लागणार आहेत. त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. तथापि फक्त तुम्हाला उत्पादन करण्यासाठी व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला आयात निर्यात वजन लोडिंग साठी मशीनची देखील आवश्यकता लागणार आहे. तसेच किरकोळ व्यवसायासाठी तुम्हाला कोणतेही मशीनची (Retail Business Not required Machines) आवश्यकता लागणार नाही. सर्व व्यवस्थित तुम्ही एकटे (One Person Manage This Business) देखील करू शकता. परंतु तुमच्या कामाच्या प्रकारावर अवलंबून असेल की तुम्ही कशा प्रकारे काम करता. त्यामुळे तुम्ही एक कामगार देखील ठेवू शकता. व अपॉइंटमेंटच्या गरजे बद्दल अधिक माहिती त्याला देऊ शकता.

तुमचा संपूर्ण व्यवसाय सेट करून घ्या (Get your business completely set up)

तुम्ही मित्रांनो आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्राप्त केल्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्ही उत्पादन कारखाना सुरू करत असाल तर तुम्ही मशीनची देखील काळजी घेतली पाहिजे. पुरेसे अंतर ठेवून हा व्यवसाय तुम्ही सेट केला पाहिजे. जेणेकरून कोणतेही हानी होणार नाही. तुम्हाला ग्राहकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व मार्केटमध्ये कोणता ट्रेंड नवीन आहे. त्यासारखी कपडे खरेदी करणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहक देखील आकर्षित होतील व आपला व्यवसाय देखील सुरळीत प्रमाणात चालेल. तसेच किरकोळ व्यवसायासाठी तुम्ही स्टोअरला देखील योग्य प्रकारे सजवू शकता.

तुमच्या स्टॉक कडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. (Pay close attention to your stock)

मित्रांनो तुम्ही जर रिटेलर स्टोअर उघडत असाल तर तुमच्या व्यवसाया मधील कापडां कडे लक्ष देणे आपल्याला खूपच गरजेचे आहे. कारण की एखाद्या विशिष्ट उत्पादनावर आपले लक्ष करण्यात केव्हाही चांगलेच असते. म्हणून बाजारामध्ये कोणत्या प्रमाणात कपडे जास्त ट्रेंडिंगला आहेत. व कोणते कापड घेणे लोक पसंत करतात. त्याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. जेणेकरून तुमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकेल. व त्यांच्यापर्यंत आपण चांगल्या प्रमाणात कपडे पोहोचू शकतो. व ग्राहकांनी एकदा कपडे खरेदी केल्यानंतर ग्राहक आपल्या दुकानाला सतत आला पाहिजे याच्याकडे देखील आपल्याला लक्ष दिले पाहिजे.

महत्त्वाची गोष्ट व्यवसायाची जाहिरात करा (You Can Promote Your Business)

मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला आहे, हे नागरिकांना कळणार नाही. या कारणामुळे तुम्हाला जाहिरात करणे खूपच गरजेचे आहे .यामुळे तुम्ही उद्घाटन शुभारंभ करते वेळेस खूप मोठ्या लोकांना आमंत्रित करू शकता. जेणेकरून सर्व नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होतात व व्यवसायाची देखील चांगल्या प्रमाणात जाहिरात होते. किंवा तुम्ही सोशल वेबसाईट तयार करून किंवा instagram द्वारे व्हाट्सअप द्वारे फेसबुक द्वारे देखील जाहिरात करू शकता. असे केल्यास नागरिकांना समजू शकेल की तुमच्या दुकानात विविध स्टॉक उपलब्ध आहेत. ग्राहकांना जर तो स्टॉक आवडला तर ग्राहक आपल्या दुकानाला नक्कीच भेट देऊ शकतील. व दुकानातून कापड खरेदी करू शकतील तर मित्रांनो हा होता कापड व्यवसाय बद्दल सविस्तर ब्लॉग. ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग सोबत धन्यवाद.

Leave a Comment