ATM New Rules 2025: मित्रांनो आज कालच्या डिजिटल युगामध्ये आपण तर एटीएम कार्ड नक्कीच वापरत असाल. एटीएम कार्ड च्या माध्यमातून आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने ट्रांजेक्शन करू शकतो. परंतु आपल्याला त्याबद्दलच्या नियमांचे पालन करणे खूपच गरजेचे असते. एटीएम च्या नवीन नियमात कोणकोणते बदल झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो रिझर्व बँक ऑफ इंडिया ने एटीएम कॅश विड्रॉल च्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत. ज्यामुळे बँकिंग व्यवहार खूपच जास्त सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहेत. या नियमांमुळे ग्राहकांची जी काही फसवणूक होत आहे, त्याला रोखण्यासाठी मदत होईल.
एटीएम कार्ड नवीन नियम (ATM New Rules 2025)
मित्रांनो एटीएम कार्डच्या या नवीन नियमानुसार एटीएम मधून आपण कॅश काढल्यानंतर ग्राहकांची ठराविक वेळेत ती रक्कम एटीएम मधून घेतली नाही तर ती रक्कम पुन्हा एटीएम मध्ये जमा होईल. तसेच या प्रक्रियेस रिट्रॅक्शन असे देखील म्हणतात ही सुविधा मित्रांनो 2012 पर्यंत अस्तित्वात आलेली होती. परंतु फसवणुकीच्या घटनांमुळे ती सुविधा पुन्हा बंद करण्यात आली होती. परंतु आत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. व ही सुविधा लवकरच पुन्हा चालू होणार आहे.
ग्राहकांसाठी नवीन सुरक्षा
मित्रांनो कॅश रिट्रॅक्शन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांच्या रकमेची सुरक्षितता अधिक वाढणार आहे. यामुळे फसवणूक होण्याची जी काही शक्यता आहे ती देखील कमी होईल व एटीएम मधून पैसे काढताना काही तांत्रिक अडचण आली तर ती रक्कम ट्रेमध्ये अडकली किंवा ती रक्कम काही वेळेत एटीएम च्या सिस्टम मध्ये पुन्हा जमा होईल ती रक्कम तुमच्या बँक खात्यात पुन्हा जमा होणार आहे. असे मित्रांनो हे नवीन नियम आहेत ते लवकरच सर्व एटीएम मध्ये लागू केले जाणार आहेत.
फसवणुकीवर नियंत्रण (Fraud control)
मित्रांनो मागील काही वर्षांपूर्वी अनेक नागरिक किंवा फसवणारे गुन्हेगार एटीएमच्या ट्रेमध्ये बनावट कव्हर लावून रोख रक्कम चोरायचे व ग्राहकांना वाटायचे की पैसे काढण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक समस्या आली आहे. यामुळे ग्राहकांचे पैसे फसवणूक करणाऱ्यांकडे जायचे परंतु मित्रांनो आता सर्व एटीएम मध्ये कॅश रिट्रॅक्शन प्रणाली लागू झाल्यानंतर अशा घटनांवर देखील नियंत्रण बसेल व नागरिकांचे पैसे पुन्हा आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतील.
सर्व बँकांसाठी आरबीआयच्या नवीन सूचना जारी
- सर्व एटीएम मशीन्स मध्ये कॅश रीट्रॅक्शनची नवीन सुविधा लवकरात लवकर लागू करावी.
- ज्या ठिकाणी फसवणुकीच्या घटना सर्वात जास्त प्रमाणात घडत आहेत त्या ठिकाणी प्रणालीची अंमलबजावणी प्राधान्याने करावी व लवकरात लवकर करण्यात यावी.
- सर्व बँकांनी एटीएम मशीन्स मध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून अधिक सुरक्षिता वाढवावी व विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करावी जेणेकरून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
या प्रणालीचे ग्राहकांना होणारे फायदे (ATM New Rules 2025)
- एटीएम मध्ये पैसे काढल्यानंतर ते पैसे सुरक्षित राहतील
- फसवणुकीच्या घटना बऱ्याच प्रमाणात बंद होतील.
- एटीएम व्यवहार व बँकिंग व्यवहार जास्त सुरक्षित होईल.
मित्रांनो एटीएमचे हे नवीन अपडेट्स समोर आलेले आहेत. आरबीआय ने नुकतेच नियम जारी केले आहेत या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये नक्कीच नवी क्रांती घडेल व ग्राहकांची सुरक्षितता अधिक वाढण्यास मदत होईल. यामुळे फसवणूक करणाऱ्यांवरती नियंत्रण बसेल बँक आणि ग्राहक या दोघांसाठी ही सुधारणा खूपच महत्त्वाची आहे. एटीएम प्रगतीमुळे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत.