Cotton And Soyabean Subsidy List : कापूस सोयाबीन अनुदान यादी जाहीर असे करा आपले नाव चेक

Cotton And Soyabean Subsidy List: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला यावर्षी सरासरीपेक्षा खूपच दर कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कापूस व सोयाबीन अनुदानाची लाभार्थी यादी मित्रांनो जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकावरती अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण कापूस व सोयाबीन पीक अनुदानाची यादी ऑनलाईन कशी चेक करायची पाहणार आहोत.

शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या किमतीमध्ये घसरण झाल्यामुळे. शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात मोठे नुकसान सोसावे लागले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने खरीप हंगाम 2023-24 मध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर च्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5000 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे, व याची घोषणा देखील केलेली आहे. (Cotton And Soyabean Subsidy List)

सोयाबीन व कापूस अनुदान यादीत नाव पाहण्याची प्रोसेस..!

शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी सरकारने एक पोर्टल विकसित केले आहे, या पोर्टल वरती पिकनिहाय व गाव निहाय वैयक्तिक खातेदारकांची यादी देण्यात येते व त्यामध्ये शेतकरी आपले नाव चेक करू शकतात. ऑनलाइन यादी पाहण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे लिंक दिलेली आहे. त्यावरती जाऊन आपण आपली ऑनलाईन यादी पाहू शकता.

  • सर्वात अगोदर ही वेबसाईट ओपन करा
  • त्यानंतर “Farmer Search” वर क्लिक करा

नंतर “Farmer Search ” पुढे “Farmer Login” मध्ये आपला “Aadhaar Number” टाकून “Get OTP for Aadhaar Verification” वर क्लिक करून “Farmer Login OTP” त्या ठिकाणी टाकून Verify करा. पुढे तुमच्यासमोर राज्यातील सर्व विभागातील कापूस व सोयाबीन अनुदानाच्या याद्या आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी आपला विभाग, जिल्हा, तालुका व आपले गाव निवडून त्या ठिकाणी आपल्याला सर्च वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर कापूस व सोयाबीन अनुदानाची लाभार्थी यादी तुमच्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव सर्वे नंबर, खाता नंबर, पिकाचे नाव व एकूण क्षेत्र आपल्याला पाहायला मिळेल.

शेतकरी मित्रांनो राज्यातील सन 2023 24 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये तसेच 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी क्षेत्रानुसार प्रत्येक हेक्टर 5000 रुपये व दोन हेक्टर च्या मर्यादित अर्थसाहाय्य देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय देखील निर्गमित केला आहे. (Cotton And Soyabean Subsidy List)

2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्यासाठी पुरवणी मागणी द्वारे उपलब्ध झालेल्या 4194.68 कोटी निधी पैकी 2516.80 कोटी निधी सन 2024 मध्ये वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. कापूस व सोयाबीन अनुदान यादीत नाव चेक करण्यासाठी सध्या वेबसाईटवर काही तांत्रिक अडचण असल्यामुळे खालील प्रमाणे अडचण येत आहे. त्यामुळे पुन्हा तुम्ही ही यादी एक ते दोन दिवसांमध्ये चेक करू शकता.

Leave a Comment