e-pik Pahani: शेतकरी मित्रांनो 2024 या चालू वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. व ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. परंतु हे काम केले नाही, त्यामुळे त्यांना पिक विमा मिळणार नाही. यामुळे मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर हे काम करावे लागणार आहे. मित्रांनो राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना ही सुरू केली आहे. या योजनेला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणत प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारने यासाठी मुदतवाढ देखील दिलेली होती. परंतु पिक विमा मिळवण्यासाठी याच्यासाठी काही अटी सरकारने निश्चित केलेल्या होत्या. त्या अटी पूर्तता केल्याशिवाय शेतकरी पिक विमा योजने साठी पात्र होत नसतात. याची नोंद घ्यायची आहे.
मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. त्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. तरच पिक विमा मिळणार आहे. इतर अटी कोणत्या आहेत हे तुम्हाला खालील प्रमाणे दिले आहे.
ई-पिक पाहणी करणे का आहे गरजेचे..? (e-pik Pahani)
सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करणे गरजेचे आहे. याशिवाय आपल्याला पिक विमा च्या माध्यमातून अनुदान मिळणार नाही. तुम्हाला देखील आपल्या पिकाची पिक ई-पाहणी करायची असेल तर तुम्ही ई-पिक पाहणी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपली ई-पिक पाहणी मोबाईल वरती करू शकता. तुम्ही जर पिक विमा योजनेअंतर्गत ई-पीक पाहणी केली नाही तर तुमची जमीन ही पडीक गृहीत धरली जाईल. व तुम्हाला पिक विमा मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला आपली लवकरात लवकर ई-पिक पाहणी पूर्ण करायची आहे.
पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत क्लेम करा.
मित्रांनो तुमच्या पिकाचे जर आणखी नुकसान झाले नसेल परंतु तुमचे जर अतिवृष्टीमुळे किंवा कोणत्याही कारणामुळे पिकाचे नुकसान झाले तर तुम्हाला 72 तासांच्या आत मध्ये कळवावे लागणार आहे. जेव्हा अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, सततचा पाऊस होईल त्यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर 72 तासात आत मध्ये कंपनीला याबद्दलची माहिती द्यायची आहे. तुम्हाला यासाठी क्रॉप इन्शुरन्स या नावाचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून आपली नोंद करायची आहे.
मित्रांनो तुम्ही जर आपल्या पिकाची ई-पिक पाहणी केली नसेल तर लवकरात लवकर आपली ई-पिक पाहणी करा. कारण की मित्रांनो विमा भरल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती पासून आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास आपल्याला पिक विमा मिळेल परंतु वरील कामे तुम्ही जर केले असतील तरच तुम्हाला पिक विमा मिळणार आहे. अन्यथा तुम्ही पिक विमा साठी पात्र नसाल.
पीक नुकसान तक्रार कशी नोंदवावी?
- सर्वात अगोदर प्ले स्टोर मधून क्रॉप इन्शुरन्स ॲप इन्स्टॉल करा.
- ॲप ओपन केल्यानंतर continue as guest हा पर्याय निवडा.
- Crop loss हा पीक नुकसानीचा पर्याय निवडा.
- Crop loss intimation हा पर्याय निवडा.
- नंतर आपला मोबाईल क्रमांक टाका.
- मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी त्या ठिकाणी validate करा.
- नंतर खरीप हंगाम व वर्ष निवडा.
- नंतर योजना व राज्य निवडा.
- नंतर तुम्ही पिक विमा भरलेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पॉलिसी नंबर मिळाला आहे. तो पॉलिसी नंबर त्या ठिकाणी टाका.
- नंतर पुढे त्या ठिकाणी पावती क्रमांक वरती टिक करा.
- नंतर त्या ठिकाणी तुम्हाला पॉलिसी नंबर दिसेल
- तुम्हाला ज्या गट नंबर मध्ये पिकाची तक्रार नोंदवायचे आहे तो गट नंबर त्या ठिकाणी निवडा. प्रत्येक गटासाठी तुम्हाला वेगळी तक्रार करावी लागणार आहे.
- नंतर कोणत्या दिवशी पाऊस झाला होता व कधी नुकसान झाले आहेत त्याची तारीख टाका.
- नंतर बाधित पिकाचा फोटो काढून त्या ठिकाणी अपलोड करा
- नंतर सबमिट बटनावरती क्लिक करा.
- नंतर आपली तक्रार यशस्वीरित्या त्या ठिकाणी सबमिट होईल. नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक आयडी मिळेल तो आयडी तुम्ही सेव करून ठेवा.
- अशाप्रकारे तुम्ही पीक नुकसानीसाठी क्लेम करू शकता.