Eshram Card Yojana | मोबाइलद्वारे काढता येणार आता ईश्रम कार्ड पहा संपूर्ण माहिती

Eshram Card Yojana: नमस्कार मित्रांनो, सरकारकडून नागरिकांसाठी विविध प्रकारच्या महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात येत असतात. परंतु काही योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्या कारणामुळे बरेचसे नागरिक हे योजनां पासून वंचित राहतात. त्यामुळे आपण आपल्या या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्व प्रकारच्या योजना ऑनलाईन पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे. ती म्हणजे ईश्रम कार्ड योजना. या योजनेबद्दलची आपण संपूर्ण माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत वाचा तुम्हाला या योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती मिळणार आहे.

मित्रांनो तुम्ही देखील जर आपले ईश्रम कार्ड आणखी काढले नसेल तर लवकरात लवकर काढावे. तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचा फायदा होणार आहे. यामध्ये आपल्याला फायदा कशा प्रकारे होणार आहे. याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्याला असंघटित क्षेत्रामधील काम करत असणाऱ्या नागरिकांना राष्ट्रीय स्तरावरील डाटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारकडून एक नवीन पोर्ट लॉन्च करण्यात आलेले आहे. व या पोर्टलवर कामगारांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे.

ईश्रम कार्ड योजनेअंतर्गत आतापर्यंत 25 कोटी पेक्षा कमी अधिक कामगारांची नोंद या पोर्टल वरती करण्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. या योजनेबाबतची संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. कामगारांच्या मानधनांमध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामुळे या योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना व कामगारांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

ईश्रम कार्ड योजना काय आहे. याबाबत कसे अनुदान मिळेल किंवा याचा फायदा कसा होईल याबाबत ची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचल्यानंतर तुम्हाला ईश्रम कार्ड योजनेबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल व तुमचे जे कोणतेही प्रश्न असतील ते देखील दूर होतील.

काय आहे ईश्रम कार्ड योजना (Eshram Card Yojana)

मित्रांनो जे कामगार भारत सरकारच्या असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात अशा नागरिकांसाठी एक राष्ट्रीय डाटाबेस तयार करण्यात येणार आहे. याद्वारे हे ईश्रम कार्ड पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. व सरकार अंतर्गत याला मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. रोजगार मंत्रालय द्वारे ईश्रम पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टल वरती आपली नोंदणी करावी लागणार आहे. म्हणजेच ज्या कामगारांची यावरती नोंदणी होईल त्या कामगारांना ईश्रम कार्ड अंतर्गत या विविध योजनेचा लाभ दिला जाणार आहे. व ईश्रम कार्ड देण्यात येणार आहे

मित्रांनो ईश्रम कार्ड योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही ठिकाणी काम करत असणाऱ्या कोणत्याही क्षेत्रांमधील कामगारांना या योजनेअंतर्गत आपला अर्ज करता येणार आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. जसे की मजूर असाल गावोगाव फिरून काम करत असाल. फेरीवाले घर कामगार किंवा स्थलांतरित कामगार किंवा इतर रोजंदारीचे काम तुमच्याकडे असेल तरी देखील या ईश्रम कार्ड साठी आपण अर्ज करू शकता.

ईश्रम काढण्यासाठी कोणत्या नियम व अटी आहेत (Eshram Card Yojana Terms & Conditions)

  • मित्रांनो तुम्हाला देखील ईश्रम कार्ड काढायचे असेल तर तुमचे वय हे 16 वर्ष ते 59 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे. 
  • किंवा जर व्यक्ती आयकर विभागा अंतर्गत टॅक्स भरत असेल तर त्या आयकर भरणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही. 
  • तसेच employee provident fund organisation किंवा employee State Insurance corporation हे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र असतील.
  • जे कोणतेही नागरिक यासाठी अर्ज करतील त्या नागरिकांना 12 अंकी युनिक कोड देण्यात येणार आहे त्या कोडला आपण ‘युनिव्हर्सल अकाउंट नंबर’ असे देखील म्हणू शकतो.

ईश्रम कार्ड ऑनलाईन कसे काढावे (Eshram Card Yojana Online Apply)

  • सर्वात अगोदर तुम्हाला google वरती जाऊन ईश्रम कार्ड असे सर्च करायचे आहे. किंवा खालील प्रमाणे एक अधिकृत वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुम्हाला ईश्रम कार्ड वेब पोर्टल ओपन करून घ्यायचे आहे
  • त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी Self Resistration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुम्हाला त्या ठिकाणी आपला आधार कार्ड सोबत लिंक असणारा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी टाकून CAPTCHA Fill करायचा आहे.
  • यानंतर तुम्हाला आता ईपीएफओ तसेच ESIC याची सदस्य तुम्ही नाही असे तुम्हाला त्या ठिकाणी सांगावे लागणार आहे. तुम्ही जर त्याचे सदस्य असाल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला No या पर्यायावर क्लिक करायचे आहे. व ओटीपी वरती क्लिक करा
  • नंतर तुमच्या मोबाईल क्रमांक वरती ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी त्या ठिकाणी सबमिट करा.
  • ओटीपी सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा त्या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे. व तुम्हाला काही कॅपच्या कोड व इतर अटी व शर्ती मान्यता देऊन सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे.
  • नंतर पुन्हा एकदा तुमच्या मोबाईल क्रमांक वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी त्या ठिकाणी टाकून तुम्हाला तो ओटीपी Validate करून घ्यायचा आहे.
  • नंतर तुमच्यासमोर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व आधार कार्डचे डिटेल दिसतील जसं की तुमची जन्मतारीख, पत्ता तुमचे नाव व इतर माहिती ही सर्व माहिती बरोबर आहे की नाही हे चेक करून तुम्हाला त्यावरील बटणावरती क्लिक करायचे आहे. व other डिटेल वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची खाजगी माहिती त्या ठिकाणी भरून घ्यायची आहे. जसे की तुमच्या लग्नाचे स्टेटस तुम्ही मॅरीड आहेत की नाही किंवा तुमच्या वडिलांचे नाव सामाजिक प्रवर्ग किंवा इतर जी माहिती असेल जसे की तुम्ही अपंग असाल तर Yes ऑप्शन वरती क्लिक करा परंतु तुम्ही जर अपंग असाल तर No या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नॉमिनी डिटेल्स भरून घ्यायची आहे जर तुम्ही Married असाल तर तुम्ही तुमच्या पत्नीचे नाव त्या ठिकाणी नॉमिनी म्हणून टाकू शकता. किंवा तुमच्या परिवारातील कोणत्याही सदस्याचे नाव तुम्ही त्या ठिकाणी नॉमिनीच्या स्वरूपात तुम्हाला टाकावे लागणार आहे. कारण की नंतर तुम्हाला भविष्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. कारण की तुम्ही जर आधीच Nominee ऍड केला तर तुम्हाला त्या ठिकाणी नॉमिनी सोबत कोणते रिलेशन आहे. ते त्या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. नंतर सेव अँड कंटिन्यू (Save & Continue) वरती क्लिक करा.
  • नंतर तुम्ही आत्ता सध्या ज्या ठिकाणी राहत असाल तो पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे.
  • या आधी तुम्हाला सर्वात अगोदर आपला पत्ता निवडायचा आहे. जसे की आपल्या जिल्ह्याचे नाव, आपल्या तालुक्याचे नाव आपण कोणत्या ठिकाणी राहत आहात तो भाग तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे.
  • नंतर तुम्ही अर्बन किंवा Rural क्षेत्र मध्ये राहता ते क्षेत्र निवडायचे आहे. जसं की तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर रुरल असा पर्याय निवडायचा आहे. परंतु तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्बन हा पर्याय निवडावा लागेल.
  • नंतर तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणी किती वर्षांपासून राहत आहात त्याचे स्टेटस तुम्हाला निवडावे लागणार आहे. व तुमचा हा ऍड्रेस पर्मनंट आहे की पर्मनंट नाही हे त्या ठिकाणी सांगावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • नंतर या नवीन पेज वरती तुम्हाला आपली शैक्षणिक पात्रता व इतर माहिती द्यावी लागणार आहे. जसे की यामध्ये तुमचे शिक्षण किती झालेले आहे. किंवा तुमची आत्ताची शैक्षणिक स्थिती कोणती आहे. नंतर तुम्ही दरमहा किती पैसे कमवता. किंवा तुमची पेमेंट किती आहे. याबद्दलची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे.
  • नंतर पुढील पेज वरती तुम्हाला तुम्ही कोणता व्यवसाय सध्या करत आहात याबद्दलची माहिती त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. जर तुम्हाला कोणत्या कामाचा अनुभव असेल तर त्या संदर्भात देखील माहिती तुम्ही देऊ शकता. किंवा तुम्हाला कोणताही अनुभव नसेल किंवा तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्या संबंधित तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे.
  • नंतर तुम्हाला आपल्या बँक अकाउंट संबंधित माहिती भरावी लागणार आहे. जसे की तुमचा खाते क्रमांक, तुमचे कोणत्या बँकेत खाते आहे. शाखेचे नाव, ifsc कोड किंवा इतर माहिती बँकेबद्दल तुम्हाला विचारेल ती माहिती भरून Save & Continue या पर्यायावर पुन्हा क्लिक करा.
  • पुढच्या पेज वरती तुम्हाला तुमची संपूर्ण भरलेली माहिती त्या ठिकाणी दिसेल. ती भरलेली माहिती तुम्ही बरोबर आहे की चुकीची ती माहिती तुम्ही एकदा चेक करा. कारण की एकदा भरलेला फॉर्म हा डिक्लेरेशन साठी जात असल्याकारणाने तुम्हालाही माहिती पुन्हा एडिट करता येणार नाही. यामुळे तुम्हाला एकदा भरलेली माहिती पुन्हा चेक करावी लागणार आहे. नंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे
  • नंतर तुमच्या स्क्रीन वरती तुम्हाला सेव चे ऑप्शन त्यामध्ये दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर ईश्रम कार्ड बनवून तुमच्यासमोर तयार झालेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. नंतर तुमचे ईश्रम कार्ड तुम्ही मोबाईल मध्ये सेव करू शकता.
  • ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यायचे आहे. व यानंतर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर तुम्हाला लवकरच तुमचे ईश्रम कार्ड मिळून जाणार आहे.

ईश्रम काढल्यावर काय फायदा होतो?

मित्रांनो असंघटित क्षेत्रामधील कामगारांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी सरकारचा मुख्य उद्देश आहे. कारण की आता मित्रांनो हे कार्ड आधार कार्ड सोबत लिंक असल्या कारणामुळे आपल्याला असंघटित क्षेत्रामधील संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळते. नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत आपल्याला आता अपघात विमा संरक्षण देखील प्राप्त करता येणार आहे. यामुळे तुम्ही देखील जर ईश्रम काढलेले असेल तर तुम्हाला अपघाती मृत्यू झाल्यानंतर देखील सरकारकडून विमा मिळणार आहे. किंवा कायमचे अपंगत्व झाल्यास देखील तुम्हाला सरकारकडून 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळणार आहे.

पुढील काळामध्ये देखील आपल्याला ईश्रम कार्ड च्या माध्यमातून बऱ्याचशा योजनांचा किंवा इतर कोणत्याही योजनांचा सामाजिक स्तरावरील सुरक्षेच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. व तुम्ही इतर योजनांचा लाभ देखील घेऊ शकता. सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे. की भविष्यामध्ये तुम्हाला नक्कीच ईश्रम कार्डचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. सद्यस्थितीमधील 25 लाखांपेक्षा जास्त नागरिक ईश्रम कार्ड चा वापर करत आहेत. तुम्ही देखील जर आणखीन ईश्रम कार्ड काढले नसेल. तर तुम्ही लवकरात लवकर आपले ईश्रम कार्ड आपल्या मोबाईलच्या मदतीने ऑनलाइन पद्धतीने काढू शकता. व विविध सुरक्षा विमा योजनांचा लाभ घेऊ शकता.

ईश्रम कार्ड चे कोणकोणते फायदे आहेत ते आपण ऑनलाइन पद्धतीने कशाप्रकारे काढू शकतो. व ईश्रम कार्ड बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपण या लेखामध्ये सांगितलेली आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपण पुढील काळात देखील तुम्हाला सरकारच्या विविध योजना बद्दल किंवा इतर माहिती वेबसाईटच्या माध्यमातून देत राहणार आहोत. यामुळे आपल्याला तुमचा प्रतिसाद कमेंट्स द्वारे मनमोकळे पणाने नक्की कळवा धन्यवाद…!

Leave a Comment