Free Aadhar Card update | आता विनामूल्य आधार कार्ड अपडेट करा घसबसल्या

Free Aadhar Card update: नमस्कार मित्रांनो, आता आधार कार्ड हे खूपच महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. कारण की सर्व कामे आता जवळपास आधार कार्ड च्या माध्यमातून आपण करू शकतो. जसे की आधार कार्ड तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नवीन सिम कार्ड घेऊ शकता. तुमच्या बँकेत खाते ओपन करू शकता. किंवा तुम्हाला इतर कोणताही फॉर्म भरायचा असेल त्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते. तुम्हाला जर कोणतेही काम करायचे असेल तर त्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते कारण की आपल्या आधार कार्ड वरती आपला फोटो व आपल्या पत्त्याचा पुरावा असतो. त्यामुळे आधार कार्ड हे खूपच महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे.

आधार कार्ड हे डॉक्युमेंट आपण पुरावा म्हणून वापरू शकतो. आधार कार्ड वरती आपली संपूर्ण जन्मतारीख आपला आधार क्रमांक तसेच आपल्या पत्त्याचा पुरावा व आपल्या फोटोचा पुरावा असल्याकारणाने आधार कार्ड सर्व ठिकाणी वापरले जाते. परंतु तुमचे आधार कार्ड जर 10 वर्षे जुने असेल तर तुम्हाला त्याला अपडेट करावे लागणार आहे. व सरकारने यासाठी मोफत सेवा सुरू केलेली आहे. आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या आधार कार्ड अपडेट करू शकतो.

14 डिसेंबर पर्यंत मोफत आधार कार्ड करा अपडेट (Free Aadhar Card update)

तुमचे देखील आधार कार्ड जर दहा वर्षांपूर्वी काढलेले असेल तर तुम्हाला त्याला मोफत अपडेट करावे लागणार आहे. व सरकारने ही आधार Update सेवा मोफत 14 डिसेंबर 2024 पर्यंत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे. तुमचे देखील आधार कार्ड आणखी जर अपडेट केले नसेल तर तुम्ही ऑनलाईन आपले आधार कार्ड आपल्या मोबाईलचा वापर करून अपडेट करू शकता.

आधार कार्ड मोफत ऑनलाईन कसे अपडेट करायचे..?

तुम्हाला देखील जर आपले आधार कार्ड ऑनलाइन मोबाईलच्या माध्यमातून अपडेट करायचे असेल तर UIDAI च्या ऑफिसियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही आपले आधार कार्ड चा पत्ता किंवा इतर संपूर्ण माहिती अपडेट करू शकता. तेही मोफत याच्यासाठी आपल्याला 14 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. आपल्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणत्याही सीएसटी सेंटरमध्ये किंवा आधार सेंटर वरती जाण्याची गरज नाही. आपण आपल्या ऑनलाइन मोबाईलच्या माध्यमातून हे आधार कार्ड अपडेट करू शकतील.

10 वर्षे जुने आधार कार्ड बंद होणार का..? (Will 10 years old Aadhaar card be closed?)

मित्रांनो इंस्टाग्राम, यूट्यूब इत्यादी सोशल मीडिया माध्यमातून अशा बातम्या वायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. की ज्यांचे आधार कार्ड 10 वर्ष जुने आहे. त्यांचे आधार कार्ड बंद होईल. परंतु UIDAI कडून अशी आधार कार्ड बंद होण्याची कोणतीही घोषणा झालेली नाहीये. परंतु आपल्याला आपले आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या आधार कार्ड 14 डिसेंबर 2024 अगोदर अपडेट करून घ्यावे. जेणेकरून आपल्याला कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक

मित्रांनो बऱ्याच नागरिकांचा आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक नसतो काही नागरिकांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असतो परंतु त्यांचे सिम कार्ड हरवलेले असते. किंवा काही इतर समस्यांमुळे त्यांना या समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु आता आपण हे काम ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकतो. सीएससी सेंटर वरती हे काम पहिले केले जायचे. परंतु त्या ठिकाणी खूपच गर्दी होत असल्या कारणाने त्यांचे सर्व्हर देखील डाऊन होत होते. हे काम आता सरकारने ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

आता आपण आपल्या मोबाईलचा वापर करून आपले आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने मोबाईल द्वारे अपडेट करू शकतो. व त्यामध्ये आपला मोबाईल क्रमांक लिंक करू शकतो.

आधार कार्ड सोबत मोबाईल क्रमांक लिंक केल्याचे फायदे

मित्रांनो आधार कार्ड सोबत आपण आपला मोबाईल नंबर लिंक केल्यावर आपल्याला भरपूर प्रमाणात मोठे फायदे होत असतात. त्याचा फायदा आपल्याला कोणताही फॉर्म भरण्यासाठी किंवा इतर कोणतीही माहिती जसे की बँकेतील फॉर्म असेल किंवा आधार कार्डचा ओटीपी जर आपल्याला हवा असेल तर आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून याचा वापर करून हे ऑनलाईन कामे संपूर्ण घरबसल्या करू शकतो.

तुम्हाला जर उदाहरणार्थ एखादा कोणताही फॉर्म भरायचा असेल व तुम्हाला आधार कार्डच्या ओटीपी ची आवश्यकता असेल तर तुम्हाला त्यासोबत मोबाईल क्रमांक जर लिंक असेल तर आपल्या मोबाईल क्रमांक वरती ओटीपी येतो. परंतु जर मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचा म्हणजेच ओटीपी सहित फॉर्म भरता येत नाही.

ऑनलाईन आधार कार्ड सोबत मोबाईल क्रमांक लिंक करू शकतो का

तर हो मित्रांनो तुम्ही आता आधार कार्ड सोबत मोबाईल क्रमांक लिंक करणे हे काम आता घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. आपल्याला आता कोणत्याही सीएससी सेंटर वरती जाण्याची आवश्यकता नाही. आता आपण आपल्या मोबाईलचा वापर करून आपल्या आधार कार्ड सोबत आपला मोबाईल क्रमांक ऑनलाईन पद्धतीने लिंक करू शकतो. कारण सीएससी सेंटर वरती खूप गर्दी असल्या कारण त्या ठिकाणी सर्व्हर देखील त्यांचे बंद पडते. किंवा आपल्याला लाईनला खूप वेळ थांबावे लागते. यासाठी हे काम आता आपण ऑनलाइन पद्धतीने करू शकतो.

आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर कसा लिंक करावा

  • आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वात अगोदर https://uidai.gov.in/ आधार कार्डच्या या वेबसाईट वरती तुम्हाला जायचे आहे 
  • त्यानंतर त्या ठिकाणी आपली भाषा निवडा 
  • भाषा निवडल्यानंतर तुमच्यासमोर त्या ठिकाणी बरेचसे ऑप्शन ओपन होतील त्यामधील आधार अपडेट वरती क्लिक करा 
  • आधार अपडेट वरती क्लिक केल्यानंतर 
  • तुम्हाला तुमचे नाव मोबाईल क्रमांक पत्ता व पिन कोड त्या ठिकाणी टाकायचा आहे 
  • सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्हाला आदर सर्विसेस वरती क्लिक करून आपला मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे 
  • मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल
  • तो ओटीपी त्या ठिकाणी फील करा 
  • ओटीपी केल्यानंतर तुमच्यासमोर एक एनरोलमेंट नंबर येईल 
  • ते एनरोलमेंट नंबरचा एक स्क्रीन शॉट काढून ठेवा किंवा तो कोणत्या तरी एका ठिकाणी सेव करून ठेवा 

ही सर्व माहिती फील केल्यानंतर तुमच्या घरी 2 ते 3 दिवसांमध्ये एक पोस्टमन येतील. व तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाईल क्रमांक लिंक करून देतील. परंतु तुमचा आधीच तुमच्या मोबाईल क्रमांक आधार कार्ड सोबत लिंक असेल परंतु तुम्हाला पत्ता व इतर कोणतीही माहिती एडिट करायची असेल तर ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

मोबाईल द्वारे आधार कार्ड अपडेट

  • सर्वात अगोदर UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in वरती जा
  • नंतर आपली भाषा निवडा जसे की इंग्रजी,हिंदी,मराठी इत्यादी
  • नंतर तुम्हाला आधार कार्ड वर कोणती माहिती अपडेट करायची आहे ते ऑप्शन त्या ठिकाणी निवडा
  • तुम्हाला जर आपला पत्ता Update करायचा असेल तर त्या ठिकाणी सिलेक्ट करा
  • नंतर My Aadhar वर क्लिक करून त्या ठिकाणी लॉगिन करून घ्या
  • लॉगिन करण्यासाठी आपला आधार क्रमांक त्या ठिकाणी टाका आणि कॅपचा कोड टाकून लॉगिन वर क्लिक करा
  • नंतर तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असेल त्या मोबाईल वर एक OTP येईल 
  • तो OTP त्या ठिकाणी टाका लॉगिन झाल्यानंतर
  • Document Update वर क्लिक करा 
  • नंतर तुम्हाला आधार कार्ड वर काय अपडेट करायचे आहे ते निवडा
  • सर्व माहितीची पडताळणी करा ओळख तसेच पत्ता कागदपत्रे Upload करा 
  • आपण जे डॉक्युमेंट Upload करणार आहोत त्याची size 2mb पेक्षा जास्त नसावी
  • आपण पुराव्यासाठी आपले पॅन कार्ड, मतदान कार्ड अपलोड करू शकतो 
  • सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा 
  • नंतर तुमच्या मोबाईल क्रमांक वर 14 अंकी Request क्रमांक येईल त्याच्या मदतीने आपण आपले आधार स्टेटस जाणून घेऊ शकतो 

तुम्हाला जर आपले आधार कार्ड ऑफलाईन पद्धतीने अपडेट करायचे असेल तर आपल्याला त्यासाठी आपल्या जवळच्या CSC सेंटर वरती जायचे आहे. आणि त्या ठिकाणी 50/- रुपये चार्ज देऊन आपले आधार कार्ड अपडेट करायचे आहे.

Leave a Comment