---Advertisement---

Kamgar Gruhnirman Yojana: बांधकाम कामगारांना मिळणार गृहनिर्माण योजनेचा लाभ

By aadarshmarathi.com

Updated on:

Follow Us
---Advertisement---

Kamgar Gruhnirman Yojana: नमस्कार मित्रांनो, आजच्या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की राज्यातील बांधकाम कामगारांना कशाप्रकारे योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकता, व कोणकोणत्या सुविधांचा लाभ आपल्याला मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर व अचूक माहिती मिळू शकेल. Kamgar Gruhnirman Yojana

Construction workers registration संपूर्ण माहिती

मित्रांनो आपण तर बघतच असाल की महाराष्ट्राचा दिवसेंदिवस विकास होत चाललेला आहे. यामध्ये सर्वात जास्त योगदान बांधकाम कामगारांचे आहे. कारण की बांधकाम कामगारांच्या मदतीमुळे राज्य प्रगतीपथावरती आहे. त्यामुळे आता राज्य सरकार देखील बांधकाम कामगारांचा विचार करत आहे. व त्यांना वेगवेगळ्या सोयी सुविधांचा लाभ देत आहे. बांधकाम कामगारांना सुमारे जवळपास 1 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देखील दिली जाते. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्र हे राज्याच्या आर्थिक विकासाचे एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी महाराष्ट्र शासन अनेक महत्त्वकांशी योजना राबवत आहे. कारण की बांधकाम कामगारांचे आयुष्य उज्वल होण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.Kamgar Gruhnirman Yojana

गृहनिर्माण योजनेचे महत्त्व..? (Kamgar Gruhnirman Yojana)

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात स्वतःचे घर असणे हे गरजेचे असते व अनेकांचे हे स्वप्न देखील असते. बांधकाम कामगार जे इतरांची घरे बांधतात व ते आपले संपूर्ण आयुष्य खर्च करतात. त्यांना स्वतःचे घर असावे यासाठी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने गृहनिर्माण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये दिले जातात. तसेच घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देखील दिले जाते.

कोणते बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात?

  • कामगाराची महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे अधिकृत नोंद असणे गरजेचे आहे.
  • मागील वर्षभरामध्ये किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असणे आवश्यक.
  • अर्जदाराचे वय हे 18 वर्षे ते 60 वर्षा दरम्यान असावे.
    तसेच या योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा.

योजनेचे फायदे

मित्रांनो या योजनेचे फायदे फक्त गृहनिर्माण पुरतेच नाही तर शासनाने बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.Kamgar Gruhnirman Yojana

आर्थिक सुरक्षा
जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाते, तसेच घर बांधकामासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त अनुदान दिले जाते. तसेच कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे.

सामाजिक सुरक्षा

मोफत आरोग्य विमा, जीवन सुरक्षा विमा, वृद्धपकाळासाठी पेन्शन योजना, अपघात विमा संरक्षण तसेच इतर सामाजिक सुरक्षांचा लाभ बांधकाम कामगारांना दिला जातो.Kamgar Gruhnirman Yojana

---Advertisement---

Leave a Comment