Kandachal Anudan: कांदाचाळीसाठी मिळत आहे अनुदान असा करा आपला अर्ज

Kandachal Anudan: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण की मित्रांनो जे शेतकरी कांद्याचे उत्पादन करतात त्या शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव जर मिळत नसेल तर शेतकरी तो तसाच कांदा साठवणूक करून कांदा चाळमध्ये ठेवतात व योग्य बाजार भाव मिळाल्यानंतर कांदा शेतकरी विक्रीसाठी देतात. परंतु मित्रांनो शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी सुद्धा सरकार अनुदान देत आहे. यासाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो कांदा चाळी योजनेचा जर तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता. कारण की कांद्याची टिकवनुक क्षमता वाढावी व चांगली कॉलिटी राहावी म्हणून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी अनुदान दिले जाते. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कांदा चाळीसाठी हे अनुदान मिळते. तसेच या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी कोणकोणत्या अटी व शर्ती आहे. त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. व अर्ज कुठे करायचा आहे याबाबतची देखील माहिती पाहूयात. Kandachal Anudan

कांदा चाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता 

  • कांदा चाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेत जमीन असणे आवश्यक आहे. तसेच सातबारा वरती कांदा पिकाची नोंद असावी.
  • शेतकऱ्यांकडे कांदा पीक असणे सुद्धा आवश्यक आहे.
  • कांदा चाळ योजनेचा लाभ हा वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, शेतकरी महिला गट, स्वयंसहायता गट तसेच शेतकऱ्यांचे उत्पादक संघ यांना घेता येणार आहे.
  • कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासाठी काही आवश्यक डॉक्युमेंट्स लागतील. Kandachal Anudan

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

कांदा चाळ योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास खालील प्रमाणे दिलेले कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

  • सातबारा उतारा 
  • 8अ
  • आधार कार्ड 
  • बँक खाते पासबुक 
  • जातीचा दाखला (अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांसाठी)
  • व इतर आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

कांदा चाळ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

कांदा चाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वात आधी हार्टनेट या ऑनलाइन संकेतस्थळावरती भेट द्यावी लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी नोंदणी करून आपला तालुका, कृषी अधिकारी कार्यालय येथे वरील कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्वसंमती पत्र मिळाल्यानंतर कांदा चाळ उभारणीचे काम तुम्ही सुरू करू शकता. पूर्वसंमती दिल्यापासून दोन महिन्याच्या आत कांदा चाळ उभारणी आवश्यक आहे. Kandachal Anudan

ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ:- www.hortnet.gov.in

Leave a Comment