Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार 1500 की 2100 रुपये येणार

Ladaki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो व मैत्रिणींनो महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहिण योजनेला बऱ्याच दिवसां अगोदर सुरुवात झाली आहे. व या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये 7500 जमा करण्यात आले आहेत, व प्रत्येक हप्त्याला महिलांना 1500 हजार रुपये दिले जात असतात. सरकारने आता नुकतीच घोषणा केली आहे की लाडकी बहिणी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याबाबत सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

महिलांना कसे मिळतात हे पैसे? (Ladaki Bahin Yojana)

मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 2024 जुलैमध्ये ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात असते. यासाठी महिलांना अर्ज करणे गरजेचे असते व ज्या महिलांचे अर्ज Approved झाले आहेत, त्या महिलांना बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करावे लागते म्हणजे आधार कार्ड मध्ये थेट डीबीटी द्वारे हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जात असतात.

लाडकी बहिणी योजनेची अंमलबजावणी

मित्रांनो ही योजना जुलै 2024 मध्ये सुरु झाली आहे व महिलांच्या बँक खात्यामध्ये 3 हप्ते सुरळीत जमा झाले होते. जसे की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 3 हप्ते वेळेत जमा झाले होते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यासाठी अनुदान 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले होते. परंतु डिसेंबर महिन्याचे अनुदान लवकरच बँक खात्यामध्ये महिलांच्या जमा होईल अशी माहिती समोर येताना आपल्याला दिसत आहे. (Ladaki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत रक्कम वाढीचा प्रस्ताव 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महायुती सरकारने निवडणूक काळात केलेल्या घोषणेनंतर एप्रिल 2025 पासून योजनेअंतर्गत 2100 रुपयांपर्यंत वाढ होणार असल्याची माहिती दिली होती व लवकरच 2100 रुपये हप्ता महिलांना मिळणार देखील आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय आगामी अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याचे संकेत देखील दिले होते या अनुदान वाढीमुळे महिलांच्या आर्थिक सहाय्यात वाढ मिळणार आहे.

लाडकी बहिणी योजनेच्या अर्ज प्रक्रियेत पुन्हा होणार छाननी 

महिला व बाल विकास मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली मित्रांनो ज्या महिलांनी बनावट अर्ज केले आहेत, त्या महिलांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत. संपूर्ण अर्जांची तपासणी केली जाणार आहे ज्या महिला या योजनेसाठी खरोखर पात्र असतील फक्त त्याच महिलांना पुढील हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे, व पुढील हप्ते मिळणार आहेत. (Ladaki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे महत्त्व 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत फक्त आर्थिक मदत नसून महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी साधन देखील आहे. मिळणारे अनुदान महिला आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतात. तांत्रिक अडचणी किंवा इतर काही कामांसाठी महिला हे पैसे वापरू शकतात व आपल्या गरजा पूर्ण करू शकतात यामुळे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. (Ladaki Bahin Yojana)

मित्रांनो आतापर्यंत महिलांना 1500 हजार रुपये प्रति महा मिळत होते. परंतु महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात असे आश्वासन दिले होते की आपण ही रक्कम 1500 हजार रुपयांवरून थेट 2100 रुपये करणार आहोत व महायुती सरकारचा विजय झाल्यामुळे त्यांना त्यांचा शब्द पाळावा लागला आहे, व ती रक्कम थेट 2100 पर्यंत जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment