Ladki Bahin Yojana application | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ

नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या खात्यात गेल्या दोन महिन्यापासून 1500 हजार रुपये जमा केले जात आहेत. नुकताच आता तिसरा हप्ता देखील महिलांच्या बँक खाते मध्ये जमा झालेला आहे. लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार रुपये आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. व ज्या महिलांनी या माझी लाडकी बहिण योजनेसाठी आणखी अर्ज केले नसतील त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करावेत.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची शेवटची तारीख (Ladki Bahin Yojana application Last Date)

मित्रांनो महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली होती. परंतु मित्रांनो तरी देखील बऱ्याचश्या महिलांचे अर्ज करण्याचे राहिले आहेत. त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा 31 ऑगस्ट ही तारीख रद्द करून 30 सप्टेंबर पर्यंत लाडकी बहिणी योजनेसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज करायचे राहिले असतील ते आता अर्ज करू शकतात. ३० सप्टेंबर ही अर्ज करण्याची लास्ट ची तारीख असणार आहे. यानंतर कोणत्याही महिलांचे अर्ज कदाचित स्वीकारणे बंद होऊ शकते.

या महिलांना मिळाले 3000 हजार रुपये 

मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेसाठी आतापर्यंत 4500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात आणखी देखील लाडकी बहिण योजनेचे पैसे आले नाहीत. त्यांच्या अकाउंटला त्रुटी असेल किंवा त्यांचे फार्म Approve झाले नाहीत त्या महिलांना हे पैसे मिळाले नाही. त्यामुळे तुम्हाला आपले आधार बँक सीडींग स्टेटस चेक करायचे आहे.

ज्या महिलांचे अर्ज पहिल्या टप्प्यामध्ये approve झाले होते त्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 हजार रुपये रक्षाबंधन दिवशी मागील महिन्यात जमा करण्यात आलेले आहेत. तसेच ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केले होते अशा महिलांच्या खात्यात देखील मित्रांनो आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात 1 कोटी 7 लाख महिलांच्या खात्यात 1500 हजार रुपये जमा करण्यात आले होते. तसेच दुसऱ्या टप्प्यांमध्ये 52 लाख महिलांच्या खात्यात 3000 हजार रुपये दोन महिन्यांचे जमा करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेचा किती महिलांना मिळाला लाभ…?

आतापर्यंत या योजनेअंतर्गत 1 कोटी 60 लाख महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता आलेला आहे. बऱ्याचशा महिला आणखी देखील या योजनेसाठी अपात्र आहेत. व काही महिलांचे अर्ज चुकले आहेत. त्यामुळे त्यांना ते अर्ज दुरुस्त करण्यास सरकारकडून विनंती करण्यात येत आहे. ज्या महिलांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल त्यांनी लवकरात लवकर ती त्रुटी दूर करावी किंवा तुम्ही जर आणखी यासाठी आपला अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला आपला अर्ज सादर करायचा आहे.

कोणत्या महिलांना मिळणार हे पैसे 

मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी की बहिणी या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे आधार सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल त्या महिलांना याचे पैसे मिळणार आहेत. परंतु ज्या महिलांचे आधार कार्ड सोबत आपले बँक लिंक नसेल त्या महिलांना हे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला बँकेत जाऊन हे सूनीच्छित करायचे आहे की, आपल्या बँकेला आपले आधार कार्ड लिंक आहे की नाही. कारण की हे पैसे आधार कार्ड द्वारे थेट डीबीटी द्वारे आपल्या खात्यात ट्रान्सफर केले जात असतात.

कोणत्या महिला आहेत या योजनेसाठी पात्र..?

मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत 21 ते 65 या वयोगटातील सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे वर्षासाठी 18000 हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. मंजूर झालेल्या महिलांना लवकरच हे पैसे मिळणार आहेत. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता नोंदणीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आपण आता 30 ऑगस्ट ऐवजी 30 सप्टेंबर पर्यंत या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो.

Leave a Comment