Magel Tyala Solar Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार, असा करा ऑनलाईन अर्ज

Magel Tyala Solar Pump Yojana: नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांना दिवसा लाईट मिळण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत आहे. परंतु मित्रांनो शेतकऱ्यांना देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. यामुळे सरकारने एक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना मागील काही वर्षांमध्ये लागू केलेली आहे. त्या योजनेचे नाव आहे, “मागेल त्याला सौर कृषी पंप” या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतामध्ये बसवण्यासाठी सौर पंप दिले जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना विजेची कोणत्याही प्रकारची अडचण राहत नाही. दिवसा शेतकरी आपल्या पिकाला त्या पंपच्या माध्यमातून पाणी देऊ शकतात. कारण की त्याला सोलर पॅनल असल्यामुळे ते उन्हावर देखील वीज तयार करण्याचे कार्य करते. (Magel Tyala Solar Pump Yojana)

शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही खूपच महत्त्वाची आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी पैशांमध्ये मित्रांनो सोलर पॅनल दिले जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना विजेची कोणत्याही प्रकारची अडचण राहत नाही, व शेतकरी दिवसा आपल्या पिकाला पाणी देऊ शकतात. तसेच शेतकऱ्यांच्या ऊर्जाच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना राबवताना आपल्याला दिसत आहे. विजेच्या असणाऱ्या कमतरतेमुळे जे शेतकरी त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी ही योजना खूपच वरदान ठरणार आहे.

सौर कृषी पंप योजना (Magel Tyala Solar Pump Yojana)

शेतकरी मित्रांनो मागेलं त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 1 लाख 1462 सौर कृषी पंप बसविण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात जास्त कृषी पंप असणारा जिल्हा म्हणजे जालना या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सौर पंप आहे. तसेच दुसरा जिल्हा बीड कारण की बीड जिल्ह्यामध्ये देखील बरेचसे सौर कृषी पंप बसलेले आहेत. परंतु बाकीच्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला जास्त उल्लेखनीय सहभाग दिसताना पाहायला मिळत नाहीये. (Magel Tyala Solar Pump Yojana)

सौर कृषी पंप योजना उपयुक्त आहे का? (Magel Tyala Solar Pump Yojana)

मित्रांनो सौर कृषी पंप योजना ही खूपच महत्त्वाची योजना आहे. कारण की शेती करिता शेतकऱ्यांना विजेची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध होत नव्हती त्यामुळे सौर कृषी पंप हा एक चांगलाच प्रकल्प आहे. यामध्ये शेतकरी स्वतःची वीज स्वतःच निर्माण करू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेला अर्ज करायला हवा कारण की शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरून सौर पंप दिले जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना ऊर्जे संबंधित कोणतीच अडचण निर्माण होत नाही. (Magel Tyala Solar Pump Yojana)

शेतकऱ्यांना दीर्घकाल होणार फायदा.! 

शेतकरी मित्रांनो एकदा हा सोलर पॅनल बसवल्यानंतर तब्बल 25 वर्षे शेतकऱ्यांना विजेची अडचण राहणार नाही. कारण की शेतकऱ्यांना पारंपारिक असणाऱ्या विजेवरती अवलंबून राहावे लागणार होते. परंतु याद्वारे शेतकरी स्वतःची वीज दिवसा स्वत निर्माण करू शकतात. व वीजपुरवठा संबंधित कोणतेच प्रश्न उद्भवणार नाहीत. जवळपास 25 वर्ष एक सोलर पॅनल चालू करतो. त्याला 25 वर्षे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये देखील नक्कीच वाढ होईल. (Magel Tyala Solar Pump Yojana)

कोणत्या जिल्ह्यात किती सौर पंप बसवले? 

शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त सोलर पंप बसवले जाणून घेऊया तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये 15940 सोलर पंप बसवले आहे. तसेच परभणी मध्ये 9334, बीड जिल्हा 14705, छत्रपती संभाजीनगर 6267, अहिल्यानगर 7630 व हिंगोली या ठिकाणी 6014 एकूण सौर पंप बसविण्यात आले आहेत.

कृषी सौर पंप अर्ज प्रोसेस

शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील जर कृषी सौर पंपासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील प्रमाणे वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण ऑनलाइन पद्धतीने आपला मोबाईल द्वारे अर्ज करू शकता.

  • सर्वात अगोदर वेबसाईट वरती Visit करा.
  • नंतर आपला आधार क्रमांक व जिल्हा निवडा.
  • नंतर आपला तालुका व आपले गाव निवडून गट नंबर टाका.
  • नंतर सब सर्वे नंबर किंवा सब गट नंबर निवडा.
  • आपल्या जमिनीचा प्रकार निवडून तुमचे एकूण क्षेत्र निवडा.
  • नंतर जमीन मालकाचे नाव टाका.
  • नंतर आपला मोबाईल क्रमांक व आपली ईमेल आयडी टाकून त्या ठिकाणी आपले संपूर्ण नाव टाका.
  • नंतर आपल्या घराचा नंबर, तालुका, पिन कोड व इतर माहिती त्या ठिकाणी भरा
  • तुमच्याकडे आधीच एक सोलर पंप असेल तर त्या ठिकाणी Yes वर क्लिक करा नसेल तर No वर क्लिक करा, अशाप्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरा.
  • नंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट ची डिटेल मागेल जसे की बँक अकाउंट नंबर, आयएफएससी कोड, अकाउंट होल्डर नेम, बँकेचे नाव, ब्रांच नाव तसेच ब्रँचची सिटी किंवा व्हिलेज नंतर तुम्ही तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करण्यास सांगेल ते कागदपत्रे तुम्ही अपलोड करा. जसे की आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, तसेच कॅन्सल केलेला चेक, एस सी किंवा एसटी असल्यास सर्टिफिकेट व इतर माहिती असलेले कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करा.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर एकदा तो फॉर्म चेक करा फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर सबमिट करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर ज्यावेळेस या योजनेचे अर्ज तपासले जातील त्यावेळेस तुमचा यामध्ये नंबर लागलेला आहे की नाही, हे तुम्हाला मेसेज द्वारे कळवण्यात येईल. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता.

Leave a Comment