Mahindra Thar ROXX: नमस्कार मित्रांनो प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते की आपल्याकडे देखील एक चांगली गाडी असावी. परंतु त्यांना गाडी घ्यायची असेल तर त्यांना समजत नाही की आपण कोणती गाडी घेणे बेस्ट आहे. कारण की मित्रांनो मार्केटमध्ये आज काल खूप सार्या कंपन्या उपलब्ध आहेत ज्या आपल्याला चांगल्या बजेटमध्ये गाडी प्रोव्हाइड करतात.
परंतु आपल्याला समजत नाही की कोणती आकर्षक लूक देणारी गाडी आपल्याला शोभेल व आपण कोणती गाडी कमीत कमी पैशांमध्ये चांगली दिसणारी गाडी खरेदी करू शकतो. व ती गाडी दनगट देखील असेल म्हणजेच की त्या गाडीला काहीही होणार नाही. तर मित्रांनो आपण आजच्या या बातमीच्या माध्यमातून थार कार रॉक्स बद्दल बोलणार आहोत. याबाबतची तुम्हाला तर आधीचीच कल्पना असेल की थारी गाडी तुम्ही नाव नक्कीच ऐकले असेल
महिंद्रा कंपनी बद्दल माहिती (Mahindra Thar ROXX)
मित्रांनो महिंद्रा कंपनी बद्दल तर आपल्याला काही जास्त माहिती सांगण्याची गरज नाही कारण की मित्रांनो महिंद्रा कंपनी ही एक अशी कंपनी आहे. ज्याच्या माध्यमातून बऱ्याचशा गाड्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत 2 ऑक्टोबर 1945 साली महिंद्रा कंपनीची स्थापना करण्यात आली होती. त्याचे आत्ताचे सध्याचे चेअरमन आनंद महिंद्रा आहेत. आनंद महिंद्रान बद्दल तर आपल्याला माहिती असेलच की त्यांनी आतापर्यंत खूप काही चांगले कामगिरी केलेले आहेत.
महिंद्राच्या आजकाल खूप साऱ्या गाड्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. व आपल्याला या गाड्या दिवसेंदिवस वाढताना दिसत असतील म्हणजे महिंद्रा कंपनीची गाडी ही एक उत्तम प्रकारच्या क्वालिटीची गाडी आहे. कारण की महिंद्रा कंपनी हे त्यांच्या गाड्यांमध्ये चांगली कॉलिटी देते त्यामुळेच लोक त्यांची गाडी खरेदी करणे पसंत करतात. महिंद्रा थार तर आपण नक्कीच पहिली असेल व तुम्हाला देखील ती कधी ना कधी घ्यावीशी वाटली असेल.
Mahindra Thar 4×4 माहिती (Mahindra Thar ROXX)
मित्रांनो महिंद्रा कंपनीने लॉन्च केलेली एक गाडी म्हणजे महिंद्रा थार. मित्रांनो महिंद्रा थार ही एक अशी गाडी आहे जिने संपूर्ण मार्केट हलवून ठेवलेले आहे. कारण की महिंद्रा थार फोर बाय फोर ही गाडी मार्केटमध्ये अजून देखील धुमाकूळ घालत आहे. व लोकांची आणखी देखील स्वप्न आहे की ही गाडी खरेदी करावी. परंतु आता ही गाडी जास्त खरेदी झाल्यामुळे महिंद्रा कंपनीने आता एक नवीन गाडी लॉन्च केली आहे. तिचे देखील नाव “महिंद्रा थार रॉक्स” असणार आहे. पहिल्या महिंद्रा थार कारला तीन दरवाजे होते परंतु आता ही जी नवीन महिंद्रा थार रॉक्स बाजारात येणार आहे. तिला आता पाच दरवाजे असणार आहेत त्यामुळे याला आपण पाच डोअर कार म्हणू शकतो.
महिंद्रा थार रॉक्स (Mahindra Thar ROXX)
मित्रांनो महिंद्रा थार रॉक्स लॉन्च होण्या अगोदरच याची विविध ठिकाणी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळाली होती. व नागरिकांमध्ये खूप सारा उत्साह या गाडीसाठी खरेदी करण्यासाठी होता. त्यामुळे ही गाडी लवकरात लवकर लॉन्च करण्यासाठी महिंद्रा कंपनीने देखील दखल घेतली होती. व ही गाडी जास्त वेळ न लावता लवकरात लवकर लॉन्च केली आहे. या कार बद्दलची संपूर्ण माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत.
काय आहे नवीन थार रॉक्स मध्ये बदल (Mahindra Thar ROXX)
मित्रांनो जुनी थार व नवीन थार मध्ये बदल काय आहे हे पाहायचे झाले तर यामध्ये याची डिझाईन ही खूप काही वेगळी नसणार आहे. मिळती जुळती याच्यासोबत सारखीच डिझाईन आहे. परंतु ही जी नवीन थार आहे ही जुन्या थार पेक्षा खूप म्हणजे खूपच दिसण्यासाठी उत्कृष्ट व भारी दिसणार आहे. याचे फोटो देखील आपल्याला वायरल होताना पाहायला मिळत आहेत. की यामध्ये पाच दरवाजे आहेत. व याच्या डिझाईन मध्ये खूपच मॉडिफिकेशन करण्यात आलेले आहे.
महिंद्रा थार रॉक्स फीचर्स (Mahindra Thar ROXX)
महिंद्रा थार रॉक्स मध्ये विविध बदल करण्यात आले आहे. जसे की महिंद्रा थार चा लूक देखील एकदम चेंज करण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये फीचर्स देखील वेगवेगळे देण्यात आलेले आहेत. यामध्ये Level 2 ADAS, पॅनोरॅमिक सनरूफ, 10.25 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट देण्यात आलेला आहे. 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीड्स, 360 डिग्री कॅमेरा, लेदर सीट, यासह अनेक आणखी उपयुक्त फीचर्स यामध्ये देण्यात आलेले आहेत. व यामध्ये वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन देखील उपलब्ध आहेत. आपल्याला हवा असणारा कलर आपण यामध्ये खरेदी करू शकतो,
महिंद्रा थार रॉक्स बुकिंग व डिलिव्हरी (Mahindra Thar ROXX)
महिंद्रा थार रॉक्स चे बुकिंग हे 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे यावर्षी दसऱ्यापासून लोकांना पाच डोअर थार रॉक्स ची डिलिव्हरी मिळणार आहे. 14 सप्टेंबर पासून लोकांना महिंद्रा थार शोरूम मध्ये जाऊन याची राईड देखील घेता येणार आहे. तुम्हाला ही थार आता 14 सप्टेंबर पासून सर्व महिंद्रा शोरूम मध्ये पाहायला मिळणार आहे.
सेफ्टी फीचर्स (Mahindra Thar ROXX)
गाडी खरेदी करण्या अगोदर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सेफ्टी फीचर्स बाबत सेफ्टी फीचर्स बाबत जर अधिक माहिती जाणून घ्यायची झाली तर यामध्ये आपल्याला सहा एअर बॅग देण्यात आलेल्या आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक्स स्टेबिलिटी कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, इंटीलॉक ब्रेकिंग सिस्टम, हायड्रोलिक ब्रेक असिस्ट, ब्रेक लॉकिंग Deferential, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, कॉर्नर बेकिंग कंट्रोल आणि वेहिकल डायनेमिक्स कंट्रोल यासारखे विविध फीचर्स या कार मध्ये तुम्हाला आता मिळणार आहे.
जुन्या थार मध्ये आपल्याला दोन एअरबॅक्स देण्यात येत होत्या परंतु यामध्ये आता आपल्याला दोनच्या ऐवजी सहा एअर बॅग देण्यात येणार आहे. मागे जे लोक बसतील त्यांच्यासाठी देखील सेफ्टीसाठी हे फीचर खूपच महत्त्वाचे आहे. कारण की पुढील दोघांसाठी पहिल्या एअर बॅग होत्या परंतु आता मागील लोक जे बसतील त्यांच्यासाठी देखील एअरबॅगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही महिंद्रा कंपनीने खूप चांगली गोष्ट केली आहे. व सर्व गाडीमध्ये असणाऱ्यांना एअरबॅग सिस्टम इंस्टॉल केले आहे.
जुनी थार व नवी थार रॉक्स इंजिन बद्दल माहिती (Mahindra Thar ROXX)
जर इंजिन बद्दल माहिती जाणून घ्यायची झाली तर थार रॉक्स मध्ये दोन लिटर पेट्रोल इंजिन आहे. त्यामध्ये 159bhp पावर जनरेट होते. 2.2 लिटर डिझेल इंजिन 150bph पॉवर जनरेट करण्यास हे सक्षम आहे. आणि तीन डोअर थार मध्ये 2.2 लिटर डिझेल इंजिन आणि एक पॉईंट पाच लिटर डिझेल तसेच 2.0 लिटर पेट्रोल इंजिन आहे. एसयूव्ही मॅन्युअल व ऑटोमॅटिक टॉर्क कन्वर्टर ऑप्शन तुम्हाला यामध्ये मिळतो.
कधी पासून होणार थार रॉक्सची विक्री सुरू (Mahindra Thar ROXX)
मित्रांनो महेंद्र प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे थार रॉक्स ची विक्री कधीपासून सुरू होणार आहे. तर याबाबत माहिती जाणून घ्यायची झाली तर थार रॉक्स या कारची खरेदी ही 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे. 3 ऑक्टोबर 2024 पासून आपण कोणत्याही महिंद्रा च्या शोरूम मध्ये याची बुकिंग त्या ठिकाणी जाऊन करू शकता. म्हणजे तुम्हाला देखील लवकरात लवकर ही थार रॉक्स मिळू शकेल.
थार रॉक्स कलर कॉम्बिनेशन उपलब्ध (Mahindra Thar ROXX)
मित्रांनो थार रॉक्स मध्ये आपल्याला सात प्रकारचे एकूण कलर मिळणार आहेत. यामध्ये आपण आपल्या आवडीचा कलर सिलेक्ट करू शकतो. त्यामध्ये सर्वात पहिला कलर म्हणजे टॅंगो रेड, स्टिल्थ ब्लॅक, एव्हरेस्ट व्हाइट, डीप फॉरेस्ट,Nebula Blue, बॅटलरशिप ग्रे, Burnt Sienna हे एकूण 7 कलर कॉम्बिनेशन यामध्ये आपल्याला मिळणार आहे. यामधून आपण आपल्या आवडीचा कलर निवडून ही कार खरेदी करू शकतो. परंतु 3 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला कार बुकिंग साठी थांबावे लागेल.
थार रॉक्स कारची नवीन किंमत (Mahindra Thar ROXX)
महिंद्रा थार रॉक्स MX1 पेट्रोल एमटी थार किंमत 1299999 तसेच महिंद्रा थार रॉक्स MX5 डिझेल ऑटोमॅटिक थार ची किंमत 1849000 व महिंद्रा थार रॉक्स AX7L डिझेल ऑटोमॅटिक थार ची किंमत 2049000/-₹ रुपये एवढी असणार आहे. म्हणजे यामध्ये बरेचशे व्हेरिएंट उपलब्ध आहेत. तुम्हाला कोणताही verient घ्यायचा असेल त्याची किंमत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सर्च करू शकता. व तुम्हाला सर्व किमती मिळून जातील परंतु आपण जर अंदाज लावला तर महिंद्रा थार रॉक्स 15 लाख ते 22 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला मिळू शकते.