Mukhyamantri Annapurna Yojana online Apply | मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा

Mukhyamantri Annapurna Yojana online Apply: नमस्कार मित्रांनो, आता नागरिकांना मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. मित्रांनो हा निर्णय ज्यावेळेस लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. त्यावेळेसच मित्रांनो हा निर्णय घेण्यात आलेला होता. या निर्णयामध्ये असे सांगण्यात आलेले होते की ज्या शेतकऱ्यांचे किंवा नागरिकांचे गॅस सिलेंडर हे महिलांच्या नावावर असतील व त्यांना आता शासनाकडून प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. म्हणजेच की मित्रांनो एका वर्षामध्ये जर आपण 04 गॅस सिलेंडर घेतले तर त्यामधील 03 गॅस सिलेंडर आपल्याला मोफत मिळणार आहेत. म्हणजेच की त्याची जी सबसिडी आहे ती आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

कोणकोणत्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच कोणकोणत्या महिला यासाठी पात्र असणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही बातमी शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल. व याचा लाभ कसा घ्यायचा यादी प्रोसेस देखील समजेल. तर जरासाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या बातमीला सुरुवात करूया.

योजना नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 
काय लाभ मिळणार प्रतिवर्ष 03 गॅस सिलेंडर मोफत 
योजना सुरू झालेली तारीख 28 जून 2024
योजनेचा उद्देश  गरीब परिवाराला धुरा पासून आझाद करणे, इंधनासाठी झाड तोडण्यापासून वाचवणे
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन

मित्रांनो आता थोड्या दिवसांवरच सणासुदीचे दिवस आले आहे. म्हणजेच दसरा दिवाळी जवळ आलेले आहे. व तुम्हाला देखील आणखीन हे जर हे 03 गॅस सिलेंडर मोफत भेटले नसतील तर ते तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता. याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आता गृहिणींना गॅस सिलेंडरची गरज लागणार आहे. व गॅस सिलेंडरवर येणारा आर्थिक खर्चाचा ताण असल्याकारणाने महिला गॅस सिलेंडर वापरत नाहीत, व चुलीवरच स्वयंपाक करतात. परंतु मित्रांनो या कारणामुळे सरकारने आता नवीन निर्णय घेतलेला आहे. व यामध्ये सांगितले आहे की तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana

मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचे आहे. मग गॅस सिलेंडर ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. म्हणजे त्याची सबसिडी तुमच्या थेट बँक खात्यामध्ये कशी जमा होईल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर गॅस सिलेंडर योजना काय आहे? कशी आहे? व ही योजना कशासाठी सुरू केलेली आहे. याबद्दल माहिती जाणून घेऊया.

अन्नपूर्णा योजनेचा मुख्य उद्देश 

मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश काय आहे, याबाबत माहिती जाणून घ्यायची झाली तर केंद्र सरकार द्वारा पीएम उज्वला योजना याचे उद्देश लक्षात घेऊन राज्यातील गरीब परिवारांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी सुरुवात केलेली आहे. ही योजना 28 जून 2024 रोजी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, व या योजनेअंतर्गत लाभार्थींना प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना चुलीपासून दूर करण्यापासून त्यांना गॅस सिलेंडरची सवय लावणे हे आहे. व धुरापासून आझादी हे देखील मित्रांनो याचे मुख्य उद्देश असून प्रदूषण कमी करणे आणि राज्यातील महिलांना शुद्ध इंधन उपलब्ध करणे, देशातील झाडांची संख्या वाढवणे तसेच मित्रांनो या योजनेचे खूप सारे उद्देश लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे.

मित्रांनो महाराष्ट्रातील बरेचसे परिवार आहेत जे गरिबी असल्या कारणामुळे गॅस कनेक्शन लावू शकत नाही. त्यांची गरिबी दूर करण्यासाठी मित्रांनो हा निर्णय घेण्यात आलेला आहे. गरीब परिवार गॅस सिलिंडर संपल्यानंतर ते लवकर भरून आणत नाहीत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याकारणाने मित्रांनो सरकारने ही योजना सुरू केली आहे. व या योजनेअंतर्गत 52 लाख लाभार्थींना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर प्रत्येक वर्षाला मिळणार आहेत.

कसे मिळवायचे मोफत गॅस सिलेंडर 

मित्रांनो आता येणार्‍या पुढील महिन्यांमध्ये म्हणजेच की नोव्हेंबर महिन्यामध्ये दीपावलीचा सण साजरा होणार आहे. त्यामुळे आता आपल्याला जास्त स्वयंपाकाचा ताण असल्या कारणामुळे आपले गॅस सिलेंडर लवकर संपतात व मोठ्या प्रमाणात स्वयंपाकासाठी गॅसची गरज लागणार आहे. यामुळे सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला मोफत गॅस सिलेंडर घेण्यासाठी या योजनेसाठी कोणकोणत्या महिला अर्ज करू शकतात याची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्ही दीपावली आधी अर्ज केला तर तुम्हाला देखील गॅस सिलेंडर नक्कीच मोफत मिळू शकतो. याचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तसेच ऑफलाईन पद्दत देखील उपलब्ध आहे.

सरकारने ही योजना बऱ्याच दिवसांपूर्वी सुरू केली आहे. व या योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर देखील मिळालेले आहेत. परंतु मित्रांनो आणखीन ज्या महिलांनी याचा लाभ घेतलेला नाही, त्या महिला लाभ कसा घेऊ शकतात. याची माहिती जाणून घेऊया. मित्रांनो भारत सरकारने 2016 मध्ये देशातील गरजू महिलांना मोफत गॅस सिलेंडर खूप लाखो महिलांना दिले होते. परंतु त्यातील बऱ्याचशा महिलांचे गॅस सिलेंडर हे बंद राहतात. कारण की मित्रांनो आर्थिक संकटामुळे त्यांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. हे कारण आता पूर्णपणे बंद होणार आहे, व वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना पात्रता (Eligibility)

मित्रांनो ही योजना गरीब नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली असल्या कारणामुळे तुम्ही देखील जर मित्रांनो या योजनेचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला खालील प्रमाणे दिली दिलेली आहे. ती पात्र असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला हे तीन गॅस सिलेंडर प्रत्येक वर्षाला मोफत मिळणार आहेत.

  • अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावे असणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणे गरजेचे आहे.
  • तसेच या योजना अंतर्गत एक राशन कार्ड वर एक लाभार्थी पात्र राहणार आहे.
  • अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गरीब परिवारांना 14.2KG गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध होणार आहे.
  • एका कुटुंबामध्ये पाच सदस्य असणारे परिवारच या योजनेसाठी अर्ज करू शकता.
  • आणि एका महिन्यामध्ये फक्त एकच गॅस सिलेंडर मिळणार आहे.

कोणती कागदपत्रे लागणार (Documents)

  • आधार कार्ड 
  • पासपोर्ट साईज चा फोटो 
  • पॅन कार्ड 
  • रहवासी प्रमाणपत्र 
  • गॅस कनेक्शन चे खाते 
  • जातीचे प्रमाणपत्र 
  • बँक खाते 
  • जन्म प्रमाणपत्र 
  • मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा फॉर्म

 

अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करायचा..? (Mukhyamantri Annapurna Yojana online Apply)

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता जे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. यासाठी आपण आपला अर्ज कशा प्रकारे करणार आहोत याबाबत सविस्तर माहिती पाहूया.

  • सर्वात अगोदर अन्नपूर्णा योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
  • त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा रजिस्टर फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये तुमचे नाव पत्ता मोबाईल नंबर इत्यादी टाका.
  • नंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर वेबसाईटच्या मेनू वर क्लिक करा.
  • त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Apply Online वर क्लिक करा
  • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. तेथे तुम्हाला ज्याच्या नावावर सिलेंडर आहे त्याचे नाव बँक खाते, आधार कार्ड, मोबाईल नंबर इत्यादी टाका.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करण्याचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करण्यास सांगेल ती अपलोड करा.
  • एकदा भरलेला फॉर्म व्यवस्थित चेक करून सबमिट वर क्लिक करा.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर नंबर वरती एक एसएमएस येईल त्यातून तुम्हाला सूचना दिल्या जातील.
  • अशाप्रकारे आपण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपला अर्ज करू शकता.

अन्नपूर्णा योजना ऑफलाइन अर्ज पद्धत 

  • मित्रांनो ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस कनेक्शन ऑफिस मध्ये जायचं आहे.
  • त्यानंतर त्यांच्याकडून अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे 
  • किंवा तुम्हाला खालील प्रमाणे लिंक दिलेली आहे फॉर्मची त्याची प्रिंट काढा.
  • त्यात आवश्यक असणारी माहिती जोडा जसे की नाव, पत्ता मोबाईल नंबर इत्यादी.
  • नंतर अर्जदाराची आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस कनेक्शन ऑफिस मध्ये जाऊन हा अर्ज जमा करायचा आहे.
  • अशा पद्धतीने आपण ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज करू शकतो.

Mukhyamantri Annapurna Yojana online Apply Important Links

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना फॉर्म येथे क्लिक करा 
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जीआर PDF  इथे क्लिक करा 
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment