PM Aawas Yojana 2025: नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 6 लाख 36 हजार घरे मंजूर झालेले आहेत. व या योजनेमधील काही अटीमुळे गोरगरिबांना घरांचा लाभ मिळत नव्हता. या योजनेमध्ये काही निकष आहेत. यावर्षी महाराष्ट्रासाठी आता 20 लाख घरे मंजूर करण्यात आले आहेत. व गरीब कुटुंबांना याचा नक्कीच लाभ होणार आहे. केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री श्री. शिवराज सिंग चव्हाण यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. व त्यांनी सांगितले आहे की यावर्षी महाराष्ट्रासाठी 20 लाख घरे मंजूर करण्यात आले आहेत. (PM Aawas Yojana 2025)
मित्रांनो महायुती सरकार सत्तेवरती येताच केंद्र सरकारकडून मोठी बातमी समोर आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र मध्ये एका वर्षात आता तब्बल 20 लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामुळे गरीब नागरिकांना याचा नक्कीच लाभ होईल. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना घरकुलासाठी पैसे दिले जात असतात. त्यामुळे गरीब कुटुंबांना आता घर बांधण्यासाठी फायदा होणार आहे. (PM Aawas Yojana 2025)
एका वर्षात 20 लाख घरांना मंजुरी (PM Aawas Yojana 2025)
मित्रांनो दरवर्षी खूपच कमी घरांना मंजुरी देण्यात येत होती. परंतु प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत यावर्षी तब्बल 20 लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे. जी कुटुंब गरीब आहेत त्या कुटुंबांना या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आता लाडक्या बहिणींना पैशांसोबत त्यांच्या हक्काचे घर देखील मिळणार आहे.
या लाभार्थ्यांना मिळणार आवास योजनेत घरकुल (PM Aawas Yojana 2025)
मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पूर्वी ज्यांच्याकडे दुचाकी होती त्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता, व त्यांना घरकुल मिळत नव्हते परंतु आता या अटी रद्द करून ज्या लाभार्थ्यांकडे दुचाकी आहे. त्यांना देखील घरे मिळणार आहे. तसेच कुटुंबांचे जर मासिक उत्पन्न 10 हजार रुपयांपर्यंत असतील तर त्यांना या योजनेत समाविष्ट केले जात नव्हते. परंतु मित्रांनो आता ही मर्यादा 10 हजार रुपयांवरून 15 हजार रुपये उत्पन्न मर्यादा करण्यात आली आहे. तसेच 5 एकर कोरडवाहू आणि 2.5 एकर बागायती जमीन असेल तरी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.