PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. व आता 18वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आह. शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिना संपण्या अगोदरच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पी एम किसान योजनेअंतर्गत ही बातमी असणार आहे. मित्रांनो 18व्या हप्त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे. ही कोणती तारीख आहे. याबाबतची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेबद्दल अधिक माहिती माहित नाहीये त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी तुम्ही पिएम किसान योजनेचे नाव नक्कीच ऐकले असेल. परंतु तुम्हाला पीएम किसान योजना ही काय आहे. याची माहिती नसेल तर याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात की या योजनेचा कशाप्रकारे शेतकऱ्यांना फायदा होतो.
तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत अजिबात कल्पना नाही. त्या शेतकऱ्यांना मी कल्पना देतो की पी एम किसान ही योजना नरेंद्र मोदी सरकारने स्थापन केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. ही योजना फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होतो शेतकऱ्यांना शेती पिकाचे औषधे खते बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना हे पैसे दिले जातात.
पिएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात..? (PM Kisan Yojana)
या योजनेअंतर्गत 2000 हजार रुपये प्रत्येक हप्त्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात. 12 महिन्यांमध्ये मित्रांनो हे पैसे 3 वेळेस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. म्हणजेच 2000 हजार रुपयांचा 1 हप्ता असतो असे एकूण 6000 हजार रुपये प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकले जातात. याचा वापर करून शेतकरी आपल्या उपयुक्त खर्चासाठी हे पैसे वापरू शकतात.
पी एम किसान योजनेचा हप्ता हा प्रत्येक चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. मित्रांनो पीएम किसान योजना 01 डिसेंबर 2018 रोजी देशाचे वर्तमान पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत देशामध्ये स्थापन करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. व पी एम किसान या योजनेअंतर्गत आतापर्यंत करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. यामध्ये मित्रांनो आतापर्यंत या योजनेअंतर्गत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहेत. म्हणजेच की 17 हप्त्याचे मिळून एकूण 34 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान या योजनेअंतर्गत जमा केले गेले आहेत.
पी एम किसान योजनेचा अखेरचा हप्ता (PM Kisan Yojana)
शेतकऱ्यांना पीएम किसान योजने अंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये जमा केले जातात. हे 6000 हजार रुपये प्रत्येक चार महिन्यांच्या अंतराने 2000 हजार रुपये हप्ता अशाप्रकारे दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. व शेवटचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 हजार रुपयांचा कोणत्या तारखेला जमा केला आहे. याबाबत माहिती पाहायची झाली तर पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता हा 18 जुन 2024 या तारखेला जमा करण्यात आलेला. आणि आता 04 महिन्याच्या अंतराने हा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे.
पी एम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी कशी करावी..? (PM Kisan Yojana)
शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्ही देखील अजून जर लाभ घेत नसेल तर तुम्ही यासाठी लाभ कशाप्रकारे घेऊ शकता याबाबतची सविस्तर माहिती पाहूया. पी एम किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्यावी लागणार आहे. नंतर त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. जर तुम्ही या योजनेचे विद्यमान शेतकरी असाल तर तुम्हाला काही माहिती अपडेट करायची असल्यास तुम्ही त्या ठिकाणाहून अपडेट देखील करू शकता. परंतु तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तरी देखील तुम्ही याच वेबसाईटच्या मदतीने नवीन नोंदणी देखील करू शकता.
- नवीन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी New Farmer Registation वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे.
- त्यानंतर तुमच्याकडे जो मोबाईल क्रमांक असेल तो मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी टाका.
- त्यानंतर आपले राज्य, आपला जिल्हा व इतर माहिती त्या ठिकाणी निवडा (CAPTCHA) Fill करा.
- नंतर आपल्या मोबाईल क्रमांकावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी त्या ठिकाणी टाका.
- नंतर Next वर क्लिक करा तुम्हाला तुमच्याबद्दलची जी कोणती जमिनीची किंवा इतर कोणती आवश्यक माहिती आहे ती आवश्यक माहिती त्या ठिकाणी विचारेल ती आवश्यक माहिती त्या ठिकाणी टाका.
- तुमची आवश्यक असणारी माहिती आहे ती टाकून तुमची पर्सनल डिटेल्स आणि काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करण्यास सांगेल ते डॉक्युमेंट सबमिट करून तुम्हाला पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलच्या मदतीने पी एम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करू शकता. नवीन नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती एक एसएमएस येईल त्याद्वारे तुम्हाला कळेल की रजिस्टर झाले आहे की नाही.
कोणते शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात..? (PM Kisan Yojana)
तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ हा भारतातील सर्वच नागरिक घेऊ शकत नाहीत. फक्त जे शेतकरी शेती करतात तेच पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात. कारण की मित्रांनो ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच तयार करण्यात आलेली योजना आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी करण्यासाठी किंवा औषध फवारणी करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची जी काही आर्थिक संकटे शेतकऱ्यांना येतात ती सहन करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये यावी यासाठी ही योजना राबविण्यात येत असते. कारण की मित्रांनो ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेस शेतकऱ्यांना बी खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. या कारणामुळे सरकार त्यांना बी बियाणे खरेदी करण्यासाठी किंवा इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी हे पैसे प्रत्येक 04 महिन्यांच्या अंतराने खात्यात टाकत असते.
व शेतकरी या पैशांचा वापर करून आपल्या शेती पीकाचे उत्पन्न देखील वाढवू शकतात. व याच्यामधून आपल्याला उत्पन्न देखील वाढवता येते या कारणामुळे मित्रांनो शेतकऱ्यांना काही पैशांची अडचण आल्यास शेतकरी हे पैसे वापरून बी बियाणे खरेदी करू शकतील. व आपले उत्पन्न वाढू शकतील. यामुळे ही योजना तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पी एम किसान योजनेचा 18वा हप्ता पाहिजे असेल तर हे काम करावे लागणार…!
मित्रांनो भारत देशाचे विद्यमान पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे वारंवार आपल्याला सांगत आहेत. आणखीन जर काही शेतकऱ्यांनी आपली पीएमसी योजना अंतर्गत केवायसी पूर्ण केली नसेल तर आपली ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा. कारण की मित्रांनो बरेचसे नागरिक हे आपले फेक बनावट पॅन कार्ड डॉक्युमेंट टाकून या योजनेअंतर्गत लाभ घेत असतात. त्या लोकांना आळा घालण्यासाठी सरकारकडून वारंवार सूचना जारी केल्या जात आहेत. की आपली ईकेवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे.
परंतु शेतकरी मित्रांनो तुमची जर आणखीन ई-केवायसी करण्याची प्रोसेस राहिली असेल तर शेतकऱ्यांना आपली ईकेवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. याशिवाय आपल्याला पीएम किसान योजने अंतर्गत 18 वा हप्ता येणार नाही. त्यामुळे तुम्ही देखील जर आणखीन आपली e-Kyc Process पूर्ण केलेली नसेल तर लवकरात लवकर e-Kyc पूर्ण करा अन्यथा तुमचे देखील हप्ते मिळणे बंद होणार आहे. यासाठी तुम्हाला जर e-Kyc पूर्ण करायची असेल तर तुम्ही आपल्या जवळील सीएससी सेंटर वरती जाऊन याची ekyc पूर्ण करू शकता.
पी एम किसान योजनेच्या लाभार्थी संख्येत घट
शेतकरी मित्रांनो सरकारने ज्यावेळेस पीएम किसान योजने अंतर्गत ई-केवायसी करण्याचे आवाहन सर्व शेतकऱ्यांना केले आहे. त्यावेळेस पासून आपल्याला सतत Pm Kisan योजना अंतर्गत लाभार्थी संख्येत घट होताना दिसत आहे. कारण देशातील बरेचसे लोक हे बनावटी डॉक्युमेंट्स अपलोड करून या योजनेचा लाभ घेत होते. त्यांना ई केवायसी करता आली नाही. त्यामुळे मित्रांनो लाभार्थी संख्येत आपल्याला सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. तुमचे देखील या योजने मधून नाव कमी होऊ शकते. तुम्ही जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर. त्यामुळे तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत e-kyc करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पी एम किसान योजना ऑनलाइन ई केवायसी
- सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ई-केवायसी करायची असल्यास Pm Kisan चे अधिकृत पोर्टल ओपन करून घ्यायचे आहे.
- नंतर सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ओपन करून घ्यायची आहे.
- त्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला ekyc वरती क्लिक करायचे आहे.
- नंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक व त्या ठिकाणी एक कॅपच्या कोड येईल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे.
- नंतर तुम्हाला सर्च या नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- नंतर त्या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर दिसेल व मोबाईल नंबर दिसेल.
- परंतु तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्ड ची लिंक असणे गरजेचे आहे.
- नंतर मोबाईल नंबर टाकला की तुम्हाला पुढे Get OTP चे ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा.
- त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी त्या ठिकाणी टाका.
- ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी (Submit for authentication) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही आवश्यक डॉक्युमेंट्स विचारेल ते डॉक्युमेंट्स टाका.
- नंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे सबमिट होणार आहे.
- तुम्हाला जर ही पद्धत ऑनलाईन पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही आपल्या जवळील CSC सेंटर वरती जाऊन देखील ही प्रोसेस त्यांच्याकडून करून घेऊ शकता.
पी एम किसान योजनेचा 18वा हप्ता कधी येईल..?
शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत 17 वा हप्ता जून महिन्यामध्ये आला असल्या कारणामुळे 04 महिन्यांच्या अंतराने हे हप्ते दिले जातात. या कारणामुळे 05 ऑक्टोबर 2024 रोजी पी एम किसान योजनेअंतर्गत 18 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रोसेस पूर्ण झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हा 18 वा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे तुमची जरी ई-केवायसी पूर्ण झाली नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करा. म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी तुमच्या खात्यामध्ये देखील येईल.