Redmi Note 13 Pro: नमस्कार मित्रांनो, आज-काल मार्केटमध्ये खूप सार्या विविध प्रकारचे स्मार्टफोन ब्रँड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. परंतु मित्रांनो आपल्याला कमीत कमी दरामध्ये चांगला उत्तम चांगला परफॉर्मस देणारा एक कमी किमतीमधील 5G Network स्मार्टफोन हवा असेल तर मित्रांनो आजची बातमी तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो आपल्याला समजत नाही की आपण कमी बजेटमध्ये कोणता स्मार्टफोन खरेदी करावा. तर मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी सांगणार आहोत. की तुम्ही कमीत कमी किमतीमध्ये स्वस्तात मस्त स्मार्टफोन कशाप्रकारे खरेदी करू शकता.Redmi Note 13 Pro
मित्रांनो मार्केटमध्ये सध्या ओपो, सॅमसंग, एमआय, रेडमी, आयफोन, वीवो अशा विविध कंपन्या उपलब्ध आहेत. परंतु त्यामधील एक सर्वात चांगली कंपनी म्हणजे रेडमी तर मित्रांनो रेडमी कंपनीचे स्मार्टफोन हे खूपच कमी दरामध्ये आपल्याला उपलब्ध असतात हे तर आपल्याला माहितीच असेल. मित्रांनो आज प्रत्येक नागरिकांकडे स्मार्टफोन आहे. (Redmi Note 13 Pro) परंतु मित्रांनो आजकाल कोणी 4G स्मार्टफोन वापरणे चांगले मानत नाही. कारण आता 5g नेटवर्क असल्याकारणाने सर्वत्र 5G लॉन्च झाले आहे. या कारणामुळे लोक आता 5g स्मार्टफोन कडे वळले आहेत. त्यांना देखील वाटत असते की आपल्याला कमीत कमी किमतीत बेस्ट 5G स्मार्टफोन मिळवा तर आज आपण बेस्ट 5G स्मार्टफोन पाहणार आहोत.
रेडमी कंपनीची स्थापना
मित्रांनो रेडमी कंपनी बाबत जर आपण बोललो तर मित्रांनो रेडमी कंपनीची स्थापना ही 2013 मध्ये जुलै महिन्यात झाली होती. आणि याचे स्मार्टफोन खूपच बजेट प्राईज मध्ये होते. नंतर रेडमी कंपनीचे नाव बदलून XIOMI ठेवण्यात आले. म्हणजेच त्याला लोक MI फोन देखील म्हणतात. मित्रांनो रेडमी कंपनीची स्थापना ही Lei Jun यांनी केली यांचा जन्म डिसेंबर 1969 साली झाला होता. आणि आज रेडमी कंपनी ही पूर्ण भारतभर तसेच विदेशात देखील प्रसिद्ध आहे.
Redmi Note 13 Pro
मित्रांनो भारतामध्ये खूप सारे रेडमी चे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आणि या नवीन वर्षामध्ये देखील खूप सारे स्मार्टफोन लॉन्च झालेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत. परंतु आज आपण बोलणार आहोत Redmi Note 13 Pro या फोनबद्दल. जसे की या फोनमध्ये तुम्हाला किती MP चा कॅमेरा मिळतो. याची बॅटरी तसेच चार्जिंग किती वेळा मध्ये होते. याचा डिस्प्ले तसेच अन्य प्रोसेसर याबद्दल माहिती आज आपण पाहणार आहोत.
Redmi Note 13 Pro सर्व Specifications
मित्रांनो रेडमी नोट 13 प्रो 5g कनेक्टिव्हिटी सह एक भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे. या प्रत्येक फोन मध्ये Curved स्क्रीन तसेच आयपी IP 68 सर्व प्लस फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत. कमीत कमी किमतीमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स व बॅटरी असणारा हा स्मार्टफोन आपल्याला उपलब्ध आहे. अशा परिस्थितीमध्ये आगामी सिरीजच्या स्मार्टफोन मध्ये दमदार स्पेसिफिकेशन आपल्याला दिसायला मिळतील. अशी अपेक्षा आहे. मित्रांनो रेडमी नोट सिरीज च्या प्रत्येक फोनमध्ये हे खाज चिप्स व फीचर्स मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किमतीच्या आधारावर ही वेगळीच असतील.
Specifications | Details |
RAM | 12GB |
ROM | 256GB |
Display | 16.94 cm (6.67 inch) |
Front Camera | 16 Megapixel |
Rear Cameras | 200MP (OIS) + 8MP + 2MP |
Battery | 5100 mAH |
Refresh Rate | 120Hz |
Network Type | 5G |
Charger | 67Watt |
Warranty | 1 Year |
Processor | 7s Gen 2 Mobile Platform 5G |
या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला पुढील साईडने फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. ज्याद्वारे आपण आपले फिंगर टच करून आपल्या फोनला अनलॉक किंवा लॉक देखील करू शकतो. आणि या स्मार्टफोनची किंमत ही खूपच कमी आहे. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला स्टोरीजचे देखील जास्त पर्याय मिळतात. जेणेकरून आपल्याला हवे असलेले स्टोरेज सोबत फोन खरेदी करू शकतो.
Redmi Note 13 Pro Storage & Ram
मित्रांनो कोणताही स्मार्टफोन जर आपण लक्षात घेतला तर मित्रांनो काही लोकांना स्टोरेजची अतिशय आवश्यकता असते. या कारणांनी ते फोनमधील कॅमेरा बघण्याऐवजी स्टोरेज कडे बघतात. कारण की कोणत्याही फाईल किंवा फोटोज व्हिडिओज आपल्या मोबाईल मध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये 8GB Ram मुळे 128 GB Storage तसेच 8GB रॅम मधून 256 GB स्टोरेज देखील मिळते. परंतु मित्रांनो 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज तुम्हाला हवे असेल तर ते देखील पर्याय उपलब्ध आहेत. 8GB रॅम व 128 GB स्टोरेज हे उपलब्ध आहे. व 12 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज हे उपलब्ध नाही. परंतु तुम्हाला जर जास्त स्टोरेज हवे असेल तर तुम्ही 12GB रॅम व 256 जीबी स्टोरेज वाला स्मार्टफोन खरेदी करू शकता.
RAM | STORAGE |
8 GB | 128 GB |
8 GB | 256 GB |
12 GB | 256 GB |
12 GB | 128GB NOT AVAILABLE |
Redmi Note 13 Pro कलर बद्दल माहिती
मित्रांनो या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला तीन प्रकारचे कलर पाहायला मिळणार आहेत. कारण मित्रांनो आपल्याला जर आपला स्मार्टफोन एकदम युनिक वर चांगला दिसावा असे वाटत असेल तर तुम्ही यामधील कोणताही एक कलर सिलेक्ट करू शकता. आपल्याला या स्मार्टफोनमध्ये व्हाईट कलर पर्पल कलर व ब्लॅक कलर हे तीन कलर पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
- Midnight Black
- Coral Purple
- Arctic White
Redmi Note 13 Pro कॅमेरा बद्दल माहिती
मित्रांनो कोणताही स्मार्टफोन घेताना आपण कॅमेऱ्याकडे देखील लक्ष देतो. कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्या अगोदर आपल्याला त्याच्या कॅमेऱ्याकडे देखील लक्ष द्यावे लागते. कारण आपल्याला जर जरा जास्तच फोटोग्राफीचा किंवा फिरण्याचा नाद असेल तर आपण कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर कॅमेरा द्वारे फोटो तर घेतो यासाठी कॅमेरा कॉलिटी देखील चांगली असणे महत्त्वपूर्ण आहे. तर मित्रांनो कॅमेरा क्वालिटी बाबत जर आपण विचार केला तर या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 200MP main कॅमेरा सोबत दुसरा कॅमेरा 8MP मेगापिक्सल व तिसरा कॅमेरा हा 2 MP मेगापिक्सल तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. व पुढील कॅमेरा बाबत जर आपण विचार केला सेल्फी कॅमेरा बाबत तर तुम्हाला 16 MP मेगापिक्सल चा पुढील कॅमेरा मिळणार आहे. अशाप्रकारे मित्रांनो या स्मार्टफोनमध्ये मागील साईडला एकूण तीन कॅमेरा व पुढील साईडला एक कॅमेरा दिलेला आहे. ज्याद्वारे 200MP चे कॅमेरा मधून खूपच चांगल्या क्वालिटीचे फोटोज आपण काढू शकतो.
Redmi Note 13 PRO प्रोसेसर
मित्रांनो खूप साऱ्या लोकांना गेमिंग साठी हा स्मार्टफोनवर हवा असतो तर या स्मार्टफोनला तुम्ही गेमिंग साठी देखील युज करू शकता. परंतु मित्रांनो काही लोकांना जास्त गेमिंगचा नाद नसल्या कारणाने त्यांना चांगला प्रोसेसर नसला तरी देखील काही हरकत नाही. (Redmi Note 13 Pro) परंतु ज्यांना गेमिंगची आवड आहे. त्यांना चांगलाच प्रोसेसर हवा असतो. या कारणामुळे या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला खूप भारी प्रोसेसर दिला आहे. 7s Gen 2 Mobile Platform 5G | Octa Core | 2.4GHz हा प्रोसेसर या फोनमध्ये दिला आहे. हा प्रोसेसर गेमिंग साठी देखील उत्तम मानला जातो. कोणत्याही प्रकारच्या अडचणी शिवाय हा प्रोसेसर तुम्ही गेमिंग साठी देखील युज करू शकता.
Redmi Note 13PRO बॅटरी बद्दल माहिती
मित्रांनो तुमच्याकडे देखील लाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही जास्त फिरण्यासाठी हा स्मार्टफोन वापरणार असाल तर तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारची बॅटरी लाइफ देखील मिळते. हा स्मार्टफोन तुम्ही 8 ते 9 तास हेवी युजिंग साठी व कमीत कमी वापर साठी हा स्मार्टफोन 3 ते 4 दिवस आरामात बॅटरी बॅकअप तुम्हाला देऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5100mAH बॅटरी देण्यात आलेली आहे. ही बॅटरी खूपच जास्त काळ टिकते. यामुळे आपल्या स्मार्टफोनचा परफॉर्मन्स देखील चांगल्या प्रकारे मिळतो.
या स्मार्टफोन सोबत तुम्हाला 67W फास्ट चार्जर दिला जातो. जो की 40 ते 50 मिनिटांमध्ये आपल्या फोनला पूर्णपणे चार्ज करू शकतो. जर तुम्हाला देखील हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आपण खरेदी करू शकतो.
Redmi Note 13Pro डिस्प्ले बद्दल माहिती
मित्रांनो या फोनच्या डिस्प्ले बद्दल माहिती बघायला गेलो तर खूप जास्त सारे लोक जास्त डिस्प्ले कडे पाहत नाही दुर्लक्ष करतात. परंतु तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचा डिस्प्ले हवा असेल तर या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.67 inch असलेला डिस्प्ले मिळतो. 120HZ रिफ्रेश रेट सोबत 1.5k Amoled जो एक उत्तम डिस्प्ले मानला जातो.
Redmi Note 13 Pro किंमत
मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनची किंमत. मित्रांनो फोनची किंमत किती आहे हे देखील माहीत असणे आपल्याला गरजेचे आहे. तर मित्रांनो या स्मार्टफोनची किंमत स्टोरेज नुसार ठरवली जाते. जर तुम्हाला हा फोन 8GB रॅम व 128GB स्टोरेज सोबत खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत 25999/- रुपये एवढी होते.(Redmi Note 13 Pro) आणि तसेच तुम्हाला जर 8GB रॅम व 256GB स्टोरेज सह खरेदी करायचा असेल तर ₹ 27999/- किंमत आहे. व हा स्मार्टफोन तुम्हाला 12GB RAM व 256GB Storage सोबत खरेदी करायचा असेल तर या स्मार्टफोनची किंमत 29999/- एवढी आहे. परंतु तुम्हाला जर कमीत कमी स्टोरेज हवे असेल तर तुम्हाला हा स्मार्टफोन 25000 रुपयांपर्यंत देखील मिळू शकतो. तुम्ही हा फोन कोणत्याही स्मार्टफोन दुकानांमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने फ्लिपकार्ट ॲमेझॉन अशा कंपन्या द्वारे देखील ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर करू शकता.
RAM & Storage | Price |
8GB RAM 128GB STORAGE | 25999 |
8GB RAM 256 GB STORAGE | 27999 |
12GB RAM 256GB STORAGE | 29999 |