Roof Top Solar Yojana: नमस्कार मित्रांनो, सरकार नेहमीच नागरिकांसाठी विविध प्रयत्न करत आहे जसे की नागरिकांना स्वतःची वीज स्वतः तयार करता यावी यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत असते. यासाठी मित्रांनो तुमच्या घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. हे अनुदान ज्या नागरिकांना घरावरती सोलर पॅनल बसवायचे आहे त्यां नागरिकांना दिले जाते, जेणेकरून ते स्वतःची वीज स्वतःच निर्माण करू शकतील व विजेवरती जास्त लोड निर्माण होणार नाही, व विजेचे वापर देखील पुरेपूर होईल.
सोलर पॅनल बसवण्याचे फायदे.? (Roof Top Solar Yojana)
तुम्हाला देखील तुमच्या घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवायचे असेल तर तुम्ही यासाठी मोफत अर्ज करू शकता, व अर्ज झाल्यानंतर तुमचा अर्ज जर पात्र झाला तर तुम्हाला देखील मोफत सोलर पॅनल मिळू शकतो. यासाठी सरकारकडून अनुदान जारी करण्यात आलेले आहे. तुमच्या घराच्या छतावरती तुम्ही सोलर पॅनल बसून मोफत वीज मिळवू शकता. यामुळे तुमचे विजेला देखील जास्त पैसे खर्च होणार नाहीत, व तुम्ही स्वतःची वीज स्वतःच निर्माण करू शकता. हेच सरकारचे धोरण आहे. सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सोलर पॅनल योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते..?
मित्रांनो सोलर पॅनल योजनेअंतर्गत घरावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी एक निश्चित मर्यादा दिलेली असते. त्यामध्ये प्रति किलो वॅट 18000 रुपये अनुदान दिले जाते. तसेच 3 कीलो वॅट साठी 18 हजार रुपये त्याशिवाय अतिरिक्त अनुदान देखील दिले जाईल. याशिवाय 03 किलो वॅट पेक्षा जास्त क्षमतेच्या सोलर पॅनल वरती 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान नागरिकांना दिले जाते. Roof Top Solar Yojana
जर तुमचा मासिक खर्च हा 159kWh इतका असेल तर तुम्ही एक ते दोन kWh रूट टॉप सोलर पॅनल साठी अर्ज करू शकता. 150 ते 300 किलो वॅट मासिक वीज खर्चासाठी 2 ते 3 किलो वॅट सौर पॅनल सर्वोत्तम आहे. यासोबतच 300 किलो वॅट अधिक मासिक वीज खर्चासाठी 3 आणि अधिक किलोवॅट सौर पॅनल ची आवश्यकता लागेल. Roof Top Solar Yojana
ऑनलाइन अर्ज प्रोसेस (Online Apply Process)
- सोलर रूप-टॉप साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला पीएम सूर्य घर नावाची वेबसाईट ओपन करायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आपले राज्य, जिल्हा व तालुका निवडून कंपनीचा तपशील भरावा लागेल.
- त्यानंतर ग्राहक खाते क्रमांक टाकून क्लिक फॉर सोलर रूफ टॉप कॅल्क्युलेटर वरती क्लिक करून तुम्हाला कॅप्चा कोड फील करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बटणावरती क्लिक करून नवीन पेज ओपन होईल, त्या ठिकाणी वीज वितरण कंपनीचे नाव व इतर माहिती त्या ठिकाणी टाकायची आहे.
- नंतर क्लिक फॉर सोलर रुफ टॉप कॅल्क्युलेटर वरती क्लिक करून त्या ठिकाणी तुमच्यासमोर मिळालेल्या अनुदानाबद्दलची माहिती मिळेल
- save and Next वरती क्लिक करून तुम्ही तो आपला अर्ज सबमिट करू शकता अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता.Roof Top Solar Yojana