Saur krushi Vahini: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मित्रांनो आजचा दिवस हा इतिहास एक दिवस म्हणून देखील नोंदला जाऊ शकतो. कारण की शेतकऱ्यांना इतक्या दिवस रात्रीची वीज मिळत होती. व शेतकऱ्यांना थंडीच्या दिवसांमध्ये तसेच बऱ्याच नैसर्गिक संकटांचे शेतकऱ्यांना रात्रीचे दाऱ्यावर म्हणजेच शेतीला पाणी देण्यासाठी जावे लागायचे. परंतु शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात होती की आम्हाला दिवसा वीज द्यावी परंतु सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. व सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य केली नव्हती.
परंतु मित्रांनो आता नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका सभेमध्ये सांगितले की शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार आहे. ती वीज कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. किती रोजगार निर्मिती होणार आहे. व याची सविस्तर इत्यादी माहिती आपण आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्हाला देखील कृषी क्षेत्रा मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आजचा ब्लॉग पूर्ण वाचावा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकेल. की कोणत्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे. जरासा ही वेळ वाया न घालता आपण आपल्या ब्लॉग ला सुरुवात करू.
राज्यातील कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस (Historical Day)
मित्रांनो आजचा दिवस हा राज्यातील कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस राहणार आहे. कारण की या दिवशी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील हा दिवस ऐतिहासिक दिवस ठरला गेला आहे. आपल्याला तर माहीतच आहे. की प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना रात्रीची वीज दिली जात होती परंतु शेतकऱ्यांना रात्रीच्या खूप सार्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. म्हणून ही विज दिवसा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेलाच आहे. व शेतकऱ्यांचे देखील प्रश्न सोडवण्यासाठी सरकार नेहमीच तत्पर असते. या कारणाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
काय म्हणले उपमुख्यमंत्री (What says Maharashtra CM)
मित्रांनो राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 9000 मेगावॅट सौर ऊर्जेसाठी करार पत्र लेटर अवॉर्ड ऊर्जामंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात देखील आलेले आहे. यामधून आता शेतकऱ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी 40000 हजार कोटी रुपये एवढी गुंतवणूक होणार आहे. व 25 हजार रोजगार देखील निर्माण होणार आहेत. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. यामुळे पुढच्या वर्षी देखील 40% कृषी फिडर सौर उर्जेवरती येणार आहे. अशी माहिती देखील यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. व या कारणामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा वीज निर्मिती शक्य होणार आहे.
कशी मिळणार दिवसा वीज (How we Get Day Light)
मित्रांनो सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक कार्यक्रम झाला होता. यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी हा वारंवार प्रश्न तसेच शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात होती. की आम्हाला दिवसा वीज पुरवठा द्या आम्हाला रात्रीची वीज नको कारण की खूप थंडीमध्ये शेतकऱ्यांना रात्री आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी जावे लागायचे. ही मागणी देखील आता सरकारने मान्य केली आहे. 2016 मध्ये फडणवीस यांनी कृषी वाहिनी योजना देखील प्रारंभ केले होते. आताच्या काळामध्ये देखील 2000 मेगावॉट
पर्यंतची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि आता 9000 मेगावॅट सौर ऊर्जा देखील तयार करण्यात येणार आहे. अशी त्यांनी माहिती दिली.
कृषी फिडर बद्दल काय बोलले मुख्यमंत्री (krushi fidder)
त्यामध्ये 40% कृषी फीडर सौर उर्जेवरती येणार आहेत. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा दिवस आजचा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. कारण की इतिहासामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. राज्यातील असंख्य शेतकऱ्यांची मागणी होती सातत्याने की “आम्हाला दिवसा वीज मिळावी” ही मागणी आता पूर्ण होणे शक्य होईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या कृषी जगामध्ये आजचा दिवस महत्वाचा आहे. ऐतिहासिक सुवर्ण क्षणांनी लिहिलेला ऐतिहासिक दिवस असणार आहे.
कधी होईल कार्य सुरू
कमी कालावधीमध्ये जागा देखील मिळाले आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे कार्य जलद शक्य देखील होईल तसेच जे काही सौरऊर्जेवरील संकल्पना प्रयोगासाठी लागेल त्या त्वावर राळेगण सिद्धी अहमदनगर येथे ही जागा साकारण्यात येणार आहे. व यशस्वी देखील ती झाली आहे. आता जागा उपलब्ध साठी महसूल नियंत्रणेने भरीव कार्यामुळे हे देखील शक्य होईल. विकास कामांना यापुढे शासकीय मदत करतील तसेच कुठेही अडचण असेल तर शासन देखील त्याला सोडवण्याचा प्रयत्न करेल. असे देखील ते म्हणाले.
राज्यात किती मेगा वॉट ऊर्जा निर्मिती होईल
महाराष्ट्र राज्य मध्ये 3600 मेगावॉट सौर ऊर्जा क्षमता आत्तापर्यंत स्थापित केलेली आहे. पण सध्या 11 महिन्यामध्ये 9000 मेगावॅट प्रक्रिया राबवून सरकार एक विक्रम घडवणार आहे. सरकारने कमीत कमी कालावधीमध्ये जागा देखील उपलब्ध करून प्रयत्न करायला हवेत. या प्रकल्पामुळे शासनावरील विविध वीज सवलतीमुळे आर्थिक भरही कमी होणार आहे. व वीज देखील कमी प्रमाणात लागणार आहे. असेही ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा प्रकल्प आपल्याला फक्त 18 ते 19 महिन्यांमध्ये पूर्ण करावा लागणार आहे.
प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागणार
तरी आपण सर्वांनी मिळून सोबत काम केले तर आपण हा प्रकल्प एक वर्षांमध्ये पूर्ण करू शकतो. हा प्रकल्प सुरू होणार म्हणून अधिकाऱ्यांनी देखील आता थांबू नये जेवढे होईल तेवढे प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर हा प्रकल्प राबवावा पूर्वी जरी 50% कृषी फीडर देखील सौरऊर्जेवर आणण्यासाठी तयारीला तात्काळ लागावे. असे देखील ते म्हणाले पुढील दोन ते तीन वर्षात 8 लाख सौर ऊर्जा पंप सुद्धा शासनाकडून शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांचे सर्व काही प्रश्न सुटतील व आपण पुढील कार्यवाही सुरू करू, व निर्देशही काढू.
किती रोजगार उपलब्ध होणार
मुख्यमंत्री व सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 1.25 लाख रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना जागेवरती भाडे देखील देणार आहे. यामुळे 5000 कोटी रुपयांचा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी देखील हे मिळणार आहे. रिलायन्स सोबत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी करार सुद्धा करण्यात येईल. या कारणामुळे राज्यातील ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मिती क्षेत्राला देखील चालना मिळणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील विभागीय आयोगाने जिल्हा अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते. सभागृहामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव ऊर्जा महावितरणाचे व व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र हे देखील उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेचे महासंचालक कादंबरी बलकवडे हे देखील या ठिकाणी कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित होते. व मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सैनिक देखील त्या ठिकाणी या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. व उपमुख्यमंत्र्यांचे सचिव परदेशी यांच्यासह खूप सारे नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. यांच्यासमोर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. की शेतकऱ्यांना आता रात्री शेतीला पाणी देण्याची गरज राहणार नाही. शेतकरी आता दिवसा आपल्या शेतीला पाणी देऊ शकतात. व शेतकऱ्यांना दिवसा आपण वीज उपलब्ध करून देऊ.
परंतु मित्रांनो आता सध्यापासूनच हा निर्णय राबवला जाणार नाही. तर हा निर्णय कधी लागू होणार आहे, हे आपण आजच्या या बातमीच्या माध्यमातून पाहिलेच आहे. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट द्वारे आम्हाला कळवू शकता. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा का हवा? काय आहे कारण?
मित्रांनो शेतकऱ्यांकडून वारंवार मागण्या केल्या जात होत्या की आम्हाला दिवसा वीज देण्यात यावी. परंतु यामागे काय कारण आहेत हे बऱ्याच नागरिकांना अजून पर्यंत देखील माहीत नाही तर आपण तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकरी हा अवघ्या जगाचा पोशिंदा असतो. शेतकरी आपली पिकं चांगल्या प्रकारे पिकवतो व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य त्या प्रमाणात भाव देखील मिळत नाही. शेतकऱ्यांना रात्रीचे देखील शेताला पाणी द्यावे लागते.
शेतकरी रात्रीचे पाणी देण्यासाठी गेल्यानंतर काही वेळेस जंगली जनावरांचे तसेच थंडीचे व इत्यादी सापांचे वगैरे भीती असते. या कारणांनी शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात होती की आम्हाला तुम्ही दिवसा वीज पुरवठा द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. व शेतकरी सरकारचे आभारी राहतील. या मागणीवरून आता शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा निर्णय खूप दिवसानंतर घेण्यात आलेला आहे. आजच्या दिवसाची इतिहासामध्ये कृषी क्षेत्रात नोंदणी होणार आहे.