Solar Pump Vendor List : सोलर पंप पुरवठादारांची यादी कशी तपासायची

Solar Pump Vendor List: नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार भारत देशामध्ये बऱ्याच वर्षांपासून सोलर पंप योजना राबवत आहे. यामुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदा होताना आपल्याला दिसत आहे. ज्या ठिकाणी वीज पोहोचली नाही आहे त्या ठिकाणी देखील सोलर पंप उपलब्ध होत आहेत. व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यास फायदा होत आहे. परंतु मित्रांनो केंद्र शासना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे. त्या शेतकऱ्यांना हा पंप दिला जातो. यामध्ये 3.5 एचपी 5 एचपी व 7.5 एचपी पर्यंतच्या मर्यादित सोलर पंप दिले जातात. (Solar Pump Vendor List)

सोलर पंप वेंडर बद्दल माहिती 

शेतकरी मित्रांनो सोलर पंप वेंडर म्हणजे हे अधिकृत पुरवठादार असतात. हे शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून देण्याचे काम करत असतात. सोलर पंप योजना अंतर्गत सरकारने वेंडर्सची निवड केलेली असते. याद्वारे ते शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करण्यास मदत करतात. यामध्ये वेंडरची पात्रता त्यांच्या वेबसाईटची तपशील नोंदणी याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट वरती दिली जाते. (Solar Pump Vendor List)

सोलर पंप वेंडर यादी कशी पहायची 

  • सर्वात अगोदर पीएम कुसुम वेबसाईट ओपन करा.
  • नंतर Public Information विभाग निवडा.
  • State Wise Vendor List सर्च करा.
  • नंतर लिस्ट निवडा
  • आपले राज्य, जिल्हा व इतर माहिती निवडा.
  • नंतर त्या ठिकाणी पंप क्षमता निवडा 1HP ते 10HP पर्यंत
  • नंतर पंप प्रकार निवडा वॉटर फिल्ड पंप किंवा ऑइल फील्ड पंप
  • नंतर कंट्रोलर प्रकार निवडा त्या ठिकाणी नॉर्मल निवडा
  • नंतर GO बटनावरती क्लिक करून वेंडरची यादी स्क्रीन वरती ओपन होईल.

सोलर पंप वेंडर यादीमध्ये मिळणारी माहिती 

  • वेंडरचे नाव
  • ई-मेल आयडी
  • फोन नंबर
  • कार्यालयाचा पत्ता
  • नोंदणी क्रमांक
  • व इतर माहिती

महत्त्वाच्या टिप्स 

  • शेतकऱ्यांनी संपर्क करताना फक्त अधिकृत वेंडरशी संपर्क साधावा.
  • अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही संपर्क शोधू शकता.
  • त्यानंतर अधिसूचना तपासा सोलर पंप योजनेबद्दल वेळोवेळी अपडेट मिळवा.
  • पंप खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.

सोलर पंप वेंडर निवडताना ही काळजी घ्या 

  • अनधिकृत वेंडर्स कडून पंप खरेदी करू नका.
  • तसेच वेंडरची तपशील आणि नोंदणी क्रमांक तपासा.
  • पीएम कुसुम योजनेच्या सर्व अटी व शर्तींचे पालन करा व समजून घ्या.

सोलर पंप योजना खरंच फायदेशीर..?

मित्रांनो सोलर पंप योजना ही केंद्र सरकार द्वारा राबवली जाणारी खूपच फायदेशीर योजना आहे. या योजनेअंतर्गत बरेचशे शेतकरी फायदा घेत असतात व त्यांना सोलर पंप देखील मिळाले आहेत. व ते त्या सोलर पंपचा वापर करून आपल्या शेती पिकाचे उत्पन्न देखील वाढवू शकत आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील सोलर पंपचा लाभ घ्यायचा असेल तर अधिकृत वेबसाईट माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज करू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांना या घेतलेल्या सोलर पंप पासून फायदा होत आहे. त्यामुळे तुम्ही देखील जर आणखी हा पंप घेतला नसेल तर तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकता ही योजना खरच फायदेशीर आहे. (Solar Pump Vendor List)

पी एम कुसुम सोलर पंप वेबसाईट

Leave a Comment