Soyabean Cotton Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारकडून आता सोयाबीन कापूस 2023 साठी खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे नुकसान झाले आहे. व ज्या शेतकऱ्यांच्या पिकाला कमी भाव मिळाला आहे. अशा शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय आता सरकारकडून घेण्यात आलेला आहे. ही योजना मित्रांनो महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. गावानुसार शेतकऱ्यांच्या पात्र याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलच्या मदतीने यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे कशाप्रकारे चेक करू शकतात. याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो मागील वर्षी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे खूप जास्त प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. अतिवृष्टीमुळे देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाले होते. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापसाला कमी हमीभाव मिळाल्या कारणाने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. 2023 अंतर्गत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 02 हेक्टर च्या मर्यादे मध्ये 5000 हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम डीबिटी द्वारे हस्तांतरित केली जाणार आहे. यामुळे आपल्या आधार कार्ड सोबत आपली बँक लिंक आहे की नाही हे चेक करणे अत्यंत गरजेचे आहे.
कापूस सोयाबीन अनुदान 2023 (Soyabean Cotton Crop Insurance)
मित्रांनो मागील वर्षी म्हणजेच 2023 वर्षी शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते. तसेच कमी दरामुळे देखील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत होते. परंतु आता ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
- शेतकऱ्यांना 5000 हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय आता सरकारकडून घेण्यात आलेला आहे.
- सरकारने हा निर्णय नुकसान भरपाईसाठी घेतलेला आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी हा निर्णय खूपच महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना या अंतर्गत काही ना काही नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा सरकारकडून आहे.
सोयाबीन कापूस यादीमध्ये आपण आपले नाव कसे चेक करावे (How To Check List On Mobile)
मित्रांनो मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापूस पिकाचे भरपूर प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. ते शेतकरी ऑनलाइन पद्धतीने आपले नाव कशाप्रकारे चेक करू शकता. यासाठी सरकारकडून एक पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यामध्ये आपल्याला गावनिहाय म्हणजेच सर्वात अगोदर आपले राज्य सिलेक्ट करून आपल्या गावापर्यंत आपल्याला आपले तालुका तसेच इतर माहिती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्ही आपल्या गावाची यादी त्या ठिकाणी पाहू शकता. या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची खात्री देखील तुम्ही याद्वारे नक्कीच करू शकता. यामुळे तुम्हाला ही यादी चेक करणे आवश्यक आहे.
- सर्वात अगोदर यादीत नाव पहायचे असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे त्याची लिंक खालील प्रमाणे दिली आहे
- नंतर तुम्हाला Farmer Search वर क्लिक करायचे आहे.
- नंतर तुम्हाला आपला आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे.
- आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्ड नंबर वर जो मोबाईल क्रमांक लिंक असेल त्यावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी त्या ठिकाणी व्हेरिफाय करा.
ही वरील प्रोसेस तुमची पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कापूस व सोयाबीन अनुदानाची जे शेतकरी पात्र आहे त्यांची लाभार्थी यादी दिसेल. त्यानंतर तुम्ही आपला विभाग त्या ठिकाणी निवडायचा आहे. जसे की जिल्हा तालुका गाव ही सर्व माहिती निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे यादीमध्ये नाव पाहायला मिळेल.
मित्रांनो ही यादी ओपन झाल्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव तसेच इतर माहिती म्हणजेच की सर्वे नंबर, खाते क्रमांक, पिकाचे नाव, क्षेत्र व इतर माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
कापूस व सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांना कसे मिळेल (How will farmers get cotton and soyabean subsidy?)
शेतकरी मित्रांनो सरकारकडून कापूस व सोयाबीन पिकाची ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना 2023 मधील सरसकट नुकसान भरपाई मिळणार आहे. म्हणजेच की प्रत्येक हेक्टरी 5000 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा सरकारकडून घेतलेला आहे. 2 दोन हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रासाठी पात्र शेतकऱ्यांना 5000 हजार रुपये प्रति हेक्टर म्हणजेच 02 हेक्टरच्या मर्यादेमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही रक्कम आपल्याला फक्त 02 हेक्टर एवढीच मर्यादित असणार आहे. 02 हेक्टर पेक्षा जास्त तुमच्याकडे क्षेत्र असेल तर 2 हेक्टर पेक्षा पुढील क्षेत्रासाठी ही रक्कम मिळणार नाही. फक्त 2 हेक्टर साठी एकूण 10000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे.
मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेले होती. व आता शासनाकडून हा निर्णय पुन्हा निर्गमित झालेला आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आता आपल्याला चांगले आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळत आहे.
सोयाबीन कापूस अनुदान कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन पिकाचे 2023 या सालामध्ये झालेले नुकसान हे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अशी माहिती दिली आहे की, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम 26 सप्टेंबर 2024 पासून जमा करण्यात येणार आहे. सन 2023 मध्ये झालेल्या नुकसान भरपाई अंतर्गत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. परंतु त्या अगोदर आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. तरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येईल.
मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना ही अनुदान रक्कम मिळणार आहे. एकूण 4,194 कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर झालेला आहे. व त्यामध्ये 2516 कोटी रुपये शासना अंतर्गत 2024 व 2025 या वर्षासाठी दिला जाणार आहे. याची यादी जर तुम्हाला पहायची असेल तर तुम्हाला या यादीची लिंक खालील प्रमाणे दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण संपूर्ण याद्या पाहू शकतो.
लाभार्थी यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
2023 अर्थसहाय्य निर्णय पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
कार्यपद्धत निर्णय पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
पुरवणी मागणी निर्णयासाठी | येथे क्लिक करा |