Vivo v40 5G Discount: मित्रांनो वीवो कंपनीने नुकताच आपला एक नवीन 5g स्मार्टफोन लॉन्च केला होता. ज्यामध्ये आपल्याला बरेचसे नवीन फीचर्स मिळत आहेत. त्या स्मार्टफोनवर आपल्याला आता बेस्ट डिस्काउंट ऑफर मिळत आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो Vivo ने अलीकडेच भारतीय बाजारामध्ये Vivo v40 सिरीज लॉन्च केली होती. यामध्ये Vivo 40e, Vivo v40, Vivo V40 pro असे 3 मॉडेल्स होते, व हा स्मार्टफोन लॉन्च होताच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय देखील झाला व ग्राहकांनी या स्मार्टफोनला पसंत केले.
Vivo V40 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्स
मित्रांनो विवो कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर या स्मार्टफोनची किंमत ही 34,999/- रुपये इतकी होती. तसेच या स्मार्टफोनच्या टॉप Varient ची किंमत 41,999/- रुपये होती. तसेच मित्रांनो सध्या या फोनची किंमत आपल्याला कमी झालेली तर पाहायला मिळत नाहीये. परंतु यामध्ये काही ऑफर्स लागलेल्या आहेत. तुम्ही जर हा स्मार्टफोन amazon वरून खरेदी केला तर तुम्हाला 1000/- रुपयांची amazon कडून सूट मिळू शकते. परंतु यासाठी आपल्याकडे SBI Credit Card असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला 1000/- रुपयांची सूट मिळेल. (Vivo v40 5G Discount)
Vivo V40 5G फीचर्स
विवोच्या या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6.78 इंच Full HD Plus डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट ला सपोर्ट करतो. यामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात स्पीड व मल्टी टास्किंग ऑप्शन देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला Snapdragon 7 Gen processor देण्यात आलेला आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर काम करू शकतो. यामध्ये आपल्याला बरेच स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनच्या बेस वेरीएंट मध्ये 8GB Ram व 128GB इंटरनल स्टोरेज तसेच 8GB RAM आणि 256GB Storage तसेच 12GB RAM व 512GB Storage देण्यात आलेले आहे. यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर स्क्रीन वरती देण्यात आलेला आहे.
Vivo V40 5G स्पेसिफिकेशन्स
Vivo V40 Series मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा तसेच 50MP सेकंडरी सेंसर देण्यात आलेला आहे, व मागच्या बाजूस एक फ्लॅश लाईट देखील देण्यात आलेली आहे. तसेच फोनच्या मागच्या बाजूला स्मार्ट Aura लाईट देखील मिळेल. आकर्षक सेल्फी व व्हिडिओ कॉलिंग साठी तुम्ही नक्कीच हा स्मार्टफोन वापरू शकता कारण की यामध्ये पुढील कॅमेरा देखील 50MP चा देण्यात आलेला आहे. तसेच तुमचा फोन एखाद्या वेळेस जर पाण्यात पडला तर त्याला काहीच होणार नाही कारण की याला पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी IP68 रेटिंग देण्यात आलेले आहे.
Vivo V40 5G बॅटरी बद्दल माहिती
या स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन मध्ये चार्जिंग साठी आपल्याला USB Type C Port देण्यात आलेले आहे. 5500 mAh बॅटरी असल्यामुळे हा स्मार्टफोन आपल्याला पूर्ण फुल Heavy युज केला तर एक दिवस आरामात बॅटरी बॅकअप देऊ शकतो. परंतु तुमचा जर जास्त हेवी युज नसेल तर हा स्मार्टफोन तुम्हाला 3 ते 4 दिवस आरामात बॅटरी बॅकअप देईल. (Vivo v40 5G Discount)
VIVO V40 सेरीज मधील हा स्मार्टफोन फक्त 15 मिनिटांमध्ये 0% ते 50% चार्ज होतो. या स्मार्टफोन मध्ये तीन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत, जसे की Lotus purple, Ganges Blue, titanium grey हे तीन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. ज्यामधील आपण आपल्या आवडीचा कलर निवडू शकता.